नवी दिल्ली: भारत सरकारने ह्युंदाई काश्मीरच्या ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतातील कोरियन राजदूताला बोलवून घेऊन या प्रकरणाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताच्या अखंडत्वाबद्दल आणि सार्वभौमत्वाबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड भारत सरकार करणार नाही असे सरकारने कोरियन राजदूतांना स्पष्ट केले. दरम्यान कोरियन परराष्ट्र मंत्री चुंग याँग भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विट प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की "भारत सरकारने कोरियन राजदूतांना बोलावून या प्रकारांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि याबाबत कोरियन सरकारला योग्य टी कायवाह करण्यास सांगितले." भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केले की आम्ही विविध क्षेत्रांतून भारतात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचे स्वागत करतो पण भारताच्या सार्वभौमत्व बद्दल आणि अखंडत्वाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या चुकीच्या गोष्टी आम्ही कधीच सहन करणार नाही. बागांची यांनी पुढे हेही स्पष्ट केलं की "आम्ही रविवारीच ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटर खात्यावरून काश्मीर डे बद्दलची ती पोस्ट बघितली होती आणि तातडीने आम्ही कोरियन दूतावासाकडे स्पष्टीकरण मागितले. आम्ही हे प्रकरण गम्मभीर्याने घेतले आहे."
ह्युंदाई कंपनीकडून हे स्पष्ट केले गेले आहे की " ते वादग्रस्त ट्विट काढून टाकले गेले आहे. आम्ही भारताचा आदर करतो. भारत आमचे दुसरे घरच आहे. जागतिक बंधुभावाला बाधा आणणाऱ्या कुठल्याही गोष्टीला आम्ही पाठिंबा देणार नाही.