नवी दिल्ली: "भारताच्या अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी सादर केलेला वर्ष २०२२-२०२३ साठीचा अर्थसंकल्प हा खूप विचारपूर्वक केलेला आहे, विविध विषयांवर यामध्ये भर देण्यात आलेला असून तो एक 'विचारशील धोरण आराखडा' आहे" असे कौतुकोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ( IMF) व्यवस्थापकीय संचालक डॉ. क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी जाहले आहेत. या अर्थसंकल्पात वाढीव भांडवली गुंतवणूक, संशोधन, डिजिटलायझेशन यांच्या नाविन्यपूर्ण विकासावर भर देण्यात आला आहे. भारताच्या अर्थव्यवस्था येत्या काळात वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना साथीमुळे झालेल्या नुकसानीमुळे भरातच विकास दर २०२२ मध्ये ९ टक्के राहील ,पण २०२३ मद्ये पुन्हा एकदा अर्थव्यवस्था वेगाने वाढायला लागेल असाही अंदाज IMF ने वर्तवला आहे. या वाढीला पूरक अशी पावले भारताच्या अर्थसंकल्पात उचलली जावीत अशी अपेक्षा IMF व्यक्त केली होती.
" भारताच्या अर्थसंकल्पात कोरोना साथीच्या फटक्यातून सावरण्यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चात वाढ केली आहे. महामार्गाचा विकास, परवडणारी घरे, रोजगार निर्मितीसाठी तरतूद, नवीन कंपन्यांना उत्पादन निर्मितीसाठी दिलेली करसवलत, भांडवली खर्चात केलेली ३५ टक्क्यांची वाढ यांसारखी दीर्घकालीन परिवर्तनाचा विचार करणारी पावले अर्थसंकल्पात उचलली गेली आहेत." असे गौरवपूर्ण उद्गार डॉ. क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी काढले आहेत.