नवी दिल्ली: एमआयएमचे नेते आणि खासदार अससुद्दीन ओवेसी गाडीवर यांच्या उत्तरप्रदेशमधील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एकूण चार राऊंड्स फायर झाल्याचे कळले आहे. आपण सुखरूप असून आपल्याला कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती स्वतः ओवेसी यांनीच दिली आहे. मेरठवरून परत येत असताना आपल्या गादीवर गोळीबार झाल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे.
मेरठवरून परत येत असताना आपल्या गाडीवर गोळीबार झाला त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली. नंतर दुसऱ्या गाडीने आपण तिथून निघून गेलो अशी माहिती ओवेसी यांनी दिली. मेरठच्या पोलीस अधीक्षकांनी बातमी मिळताच त्वरित घटनास्थळी पोचून चौकशीचे आदेश दिले आहेत. "या घटनेची सखोल चौकशी करून उत्तरप्रदेश पोलिसांनी दोषींना कडक शिक्षा करावी" अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज अली यांनी केली आहे.