नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धास सुरुवात झालेली आहे. अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताशी चर्चा करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जो बायडेन बोलत होते.
"आम्हांला माहित आहे की या विषयावर भारत आणि आमचे एकमत नाही. भारताचे रशियाशी अनेक दशकांपासूनचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षात भारत अमेरीका संबंधसुद्धा दृढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही भारताशी चर्चा करणार आहोत." असे जो बायडेन यांनी स्पष्ट केले.दरम्यान भारताने या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे.
मोदी- पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा
गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. मोदी यांनी ताबडतोब युद्धविराम करून चर्चेतून सर्व प्रश्न सोडवावेत असा सल्ला मोदी यांनी पुतीन यांना दिला आहे. भारत सरकारने या प्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे.