व्हॅटिकन सिटी: इटलीच्या चर्चमधील पाद्रयांकडून आता पर्यंत दहा लाखांहून अधिक मुलांचे शोषण झाल्याची माहिती फ्रान्स देशाकडून झालेल्या चौकशीतून उघड झाले आहे.आता पर्यंत या सर्व घटना उघड होऊन सुद्धा या गुन्हेगार पाद्रयांना आतापर्यंत संरक्षण मिळत आले आहे असेही उघड झाले आहे.या अत्याचारांना कंटाळून लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना युरोप मध्ये उघड झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या घटना भारतासुद्धा उघड झाल्या आहेत. भारतात कॅथलिक तसेच प्रोटेस्टंट दोन्ही पंथांच्या चर्च मध्ये असे लहान मुलांच्या शोषणाचे प्रकार उघड झाले आहेत.
भारतातील सर्व प्रमुख पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चर्चमध्ये होणाऱ्या अत्याचारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आलेले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये या पाद्रयांना अटक होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. केरळ मधील एका ननवर झालेल्या अत्याचारांच्या आरोपाखाली अटक झालेले बिशप फ्रँको मुक्कल यांची निर्दोष सुटका झालेली आहे. या अत्याचारांच्या घटना उघड झाल्याने चर्चचा सोज्वळ धार्मिक बुरखा फाटला आहे.