इस्लाम सोडणारे ‘एक्स मुस्लिम्स’

    10-Feb-2022   
Total Views | 256

Ex Muslim of Keral 
 
एकीकडे कर्नाटकात हिजाब घालून वर्गात बसू देण्याची मागणी करणार्‍या मुस्लीम विद्यार्थिनींच्या भूमिकेतून कट्टर धर्मांधता दिसते तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडूसह भारतात इस्लाम सोडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यापैकीच एक म्हणजे केरळमधील आयशा मर्केराऊज. तिने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मशिदीत जाऊन इस्लाम सोडण्याची घोषणा केली. त्यामागे तिने दिलेली कारणे हिजाबसाठी आडमुठेपणा करणार्‍या मुस्लीम मुलींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारीच म्हटली पाहिजे. “जवळपास दहा वर्षांपासून इस्लामबद्दल माझ्या मनात प्रश्न होते. काही वर्षांआधी मी मोहम्मद पैगंबराचे चरित्र वाचले. पण, जसजशी पुस्तकाची पाने पलटत गेले, तसतसा माझा इस्लाम सोडण्याचा इरादा पक्का झाला. कारण, त्या पुस्तकातील दास्यता आणि स्त्रियांविषयीच्या लिखाणातून मानवाधिकाराच्या चिंधड्या उडत असल्याचे मला समजले,” असे आयशा मर्केराऊज आपल्या इस्लामत्यागाचे कारण सांगते. अर्थात, ही कहाणी फक्त आयशा मर्केराऊजचीच नाही तर केरळमधील शेकडो-हजारो मुस्लिमांनी आपला धर्म सोडला आहे. त्यातूनच सध्या केरळमध्ये ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’ संघटना चर्चेत आली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. आरिफ थेरुवथ यांनी याबाबत माहिती दिली असून ते म्हणाले की, “गेल्या वर्षभरात ३०० जणांनी इस्लामला अलविदा केले आहे. तथापि, नोंदणीकृत आकडेवारी व्यतिरिक्त इस्लाम सोडलेले जवळपास दोन हजार जण आमच्या संपर्कात आहेत. तसेच असेही शेकडो लोक असतील, ज्यांच्याशी आमचा संपर्क झालेला नाही.” दरम्यान, ‘एक्स मुस्लिम्स ऑफ संघटने’चे नाव आता समोर आले असले तरी तिचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. तसेच संपूर्ण देशभरातही ‘एक्स मुस्लिम्स ऑफ इंडिया’ नावाने कार्यरत आहे. लवकरच संघटनेला अखिल भारतीय स्वरुपात पुढे आणले जाणार आहे. तर सध्या तामिळनाडूमध्ये संघटनेच्या नोंदणीचे काम सुरु आहे. वस्तुतः इस्लाममधील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरांना धर्मनिरपेक्ष आणि पुरोगाम्यांनी विरोध करायला हवा होता. त्याविरोधात प्रबोधनपर आंदोलने, चळवळी चालवायला हव्या होत्या. पण, त्यांनी तसे केले नाही. उलट धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली मुस्लिमांनाच इस्लामचे पहिले पीडित होण्यासाठी त्यांनी हातभारच लावला. आज मात्र हमीद दलवाईंनंतर प्रथमच इस्लाममधूनच प्रभावी संघटना उभी ठाकत आहे. पण ती धर्मसुधारणेचा नव्हे, तर धर्मत्यागाचा पुरस्कार करत आहे.
 
का सोडताहेत इस्लाम?
 
एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’चे अध्यक्ष डॉ. आरिफ थेरुवथ यांनी संघटनेची तीन प्रमुख उद्दीष्टे ठेवली आहेत. त्यानुसार पहिले उद्दीष्ट म्हणजे, कुराणमधील लिखाण डिकोड करुन सर्वांसमोर आणणे, दुसरे उद्दीष्ट म्हणजे, मोहम्मद पैगंबराविषयीची सत्य माहिती उजेडात आणणे आणि तिसरे म्हणजे, जे लोक इस्लाम सोडतात त्यांना मदत करणे. कारण, त्या लोकांवर सामाजिक, आर्थिक आणि भावनिक अत्याचार केला जातो. डॉ. आरिफ थेरुवथ आपली भूमिका पटवून देताना सांगतात की, “कुराणाच्या चौथ्या प्रकरणातील ३४व्या आयतमध्ये पतीने पत्नीला मारहाण करण्याला योग्य ठरवले आहे. स्त्री पथभ्रष्ट झाल्यास तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी मारहाण करण्याची पद्धती बरोबर असल्याचे कारण यामागे दिले आहे. पण, सर्वसामान्य मुस्लिमांना याची सखोल माहिती नसते.” ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’ संघटना मात्र इस्लाममधील स्त्रीविरोधी, मानवाधिकारविरोधी बाबी समोर आणत असून, धर्म सोडणार्‍यांच्या पाठीशी उभी ठाकत आहे. दरम्यान, इस्लाम सोडणार्‍या मुस्लिमांची संख्या सध्या जरी शेकडो वा हजारोंच्या प्रमाणात दिसत असली तरी त्यात भविष्यात प्रचंड वाढ होऊ शकते. कारण, माहितीप्रसाराची नवनवी व प्रगत साधने आणि सर्वांपर्यंतची त्यांची पोहोच. यामुळे ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’चा संदेश एकाचवेळी असंख्यांपर्यंत पोहोचतो व यातूनच धर्मत्यागाची भावनाही वाढीस लागू शकते. तसेच भारतासह जगभरातील अन्य देशांतही इस्लाम सोडणार्‍यांची संख्या मोठी आहे व तिथेही त्यांच्यासाठीच्या विविध संघटना काम करत आहेत. जर्मनीमध्ये ‘सेंट्रल काऊन्सिल ऑफ एक्स मुस्लिम्स’, युनायटेड किंग्डममध्ये ‘काऊन्सिल ऑफ एक्स मुस्लिम ऑफ ब्रिटन’, ‘अमेरिकेत फॉर्मर मुस्लिम्स युनायटेड’, ‘ऑस्ट्रियात एक्स मुस्लिम इनिशिएटीव्ह’ अशा संघटना कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त नेदरलॅण्ड, बेल्जियम, स्वित्झर्लंड, सिंगापूर, कॅनडा, फ्रान्स, स्कॉटलण्ड, मोरक्को, जॉर्डन, इराण, नॉर्वे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इटली, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंडमध्येदेखील पूर्वाश्रमीच्या मुस्लिमांच्या संघटना सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हिजाबवाल्या मुलींची कोणालाही कीव वाटेल. कारण, त्यांना स्वतःलाच अजूनही आपल्यावरील अन्यायाची जाणीव झालेली नाही. पण, ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’सारख्या संघटनांची पोहोच सर्वत्र वाढल्यास या मुलीही हिजाबचा आग्रह सोडतील.
 
 

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121