'पुढे चला मुंबई' शिवसेनेचा नवा नारा ?

नव्या टॅगलाईनखाली सेना मुंबई पालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता

    10-Feb-2022   
Total Views |
 
aditya and uddhv thackeray
 
 
 
मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर प्रस्तावित असलेल्या मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष मैदानात तयारीनिशी उतरत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना देखील निवडणुकीसाठी तयारीला लागली आहे. त्यासोबतच आता या प्रस्तावित निवडणुकीसाठी शिवसेनेचा नवा नारा देखील ठरल्याचे बोलले जात आहे. २०१७ पालिका निवडणुकीत 'करून दाखवलं' या टॅगलाईन सोबत प्रचार केला होता.
 
त्याच धर्तीवर आता शिवसेनेतर्फे महापालिका २०२२साठी नाऱ्याची घोषणा केलीय जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांचा संदर्भ जोडत 'पुढे चला मुंबई' या घोषवाक्याखाली शिवसेना आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
 
मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेनेतर्फे 'करून दाखवलं' या घोषवाक्याखाली निवडणूक लढली होती. सेनेच्या या टॅगलाईनमुळे बऱ्याच वादांना आणि चर्चांना तोंड फुटले होते. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीसाठी सेनेतर्फे 'पुढे चला मुंबई' या टॅगलाईनखाली प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले तर त्याचा येत्या निवडणुकीत शिवसेनेला किती फायदा होतो ? हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.