नवी दिल्ली: अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी खासगी क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. खासगी क्षेत्राला २५ टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद ही मागच्या वर्षी पेक्षा १३ टक्क्यांनी वाढवली आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशी उत्पादनांवर भर देण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्राच्या भंगली गुंतवणुकीच्या ६८ टक्के इतकी रक्कम हि फक्त याचसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मागच्या वर्षी पेक्षा १० टक्क्यांनी वाढ यंदा करण्यात आली आहे.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्ती केला. संरक्षण क्षेत्रात संशोधनान ,कृत्रिम बुद्धिमत्ता, एसपीव्ही यांवर भर देण्यात येईल. संरक्षण क्षेत्रात स्टार्टअप्सना सुद्धा संधी दिली जाईल. संरक्षण क्षेत्रात खासगी सहभाग वाढवण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल त्यासाठी २५ टक्के इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.