मुंबई : मनोरंजन क्षेत्रात पूर्वीइतकं चित्रपटांना महत्व राहिलेले नाही. त्यामानाने ओटीटी माध्यमांवर येणारे चित्रपट आणि मालिका लोक पाहतात व त्यांनाच मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसतात. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षात ओटीटी माध्यमांमध्ये वाढ झालेली दिसते.
या निर्मिती प्रक्रियेत भारतही मागे राहिलेला नाही. या आठवड्यात भारतातून १० कंन्टेट प्रसारित झालेले आहेत. हे कन्टेन्ट अनेक वेगवेगळ्या ओटीटी माध्यमांवरून प्रसारित झालेले आहेत. फ्रेडी, गुडबाय, इंडिया लोकडाऊन, वधानधी, काला, मान्सून राग, मॉन्स्टर, डेरी ऑफ अ विम्पी कीड, क्राईम सीन्स आणि विलो अशी या नवीन रिलीज झालेल्या चित्रपट आणि मालिकांची नावे आहेत.
ही सर्व डिस्ने, हॉटस्टार, झी ५, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम या माध्यमांवरून रिलीज झाली आहेत. त्यापैकी २९ नोव्हेम्बरला क्राईम सीन्स प्रसारित झाले, विलो ३० नोव्हेम्बरला, काला १ डिसेम्बरला तर इतर सर्व २ डिसेम्बरला प्रसारित झाले आहेत.
गुडबाय, काला आणि क्राईम सीन्स नेटफ्लिक्स वर, वधानधी अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर तर इंडिया लोकडाऊन आणि मान्सून राग झी ५ वर प्रसारित झाले आहेत. उर्वरित सर्व मालिका आणि चित्रपट डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित झाले आहेत.