चॉकलेटचे आमिष दाखवून शाहनवाजने केला पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

    07-Dec-2022
Total Views | 80

Palghar rape case
 
 
पालघर : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एका १९ वर्षीय तरुणाने ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहनवाज शाह असे आरोपी तरुणाचे नाव आहे. बलात्कारानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. चॉकलेट मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने त्या मुलीला त्याच्या घरात नेले, घरातून नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली.
 
 
नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला
 
या घटनेनंतर मुलगी रडत रडत तिच्या आईकडे गेली तेव्हा मुलीच्या आईला आपल्या मुलीवर झालेल्या क्रौर्याची कल्पना आली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तत्काळ बोईसर पोलिसांकडे तक्रार केली. तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
या प्रकरणाबाबत पालघर पोलिसांनी सांगितले की, “५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय शाहनवाज शाह याला अटक करण्यात आली आहे. मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले होते. सध्या मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121