मुंबई : बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केल्याच्या घटनेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, वेळ पडल्यास प्रकरण केंद्राकडेही नेऊ शकतो, अशी भूमिका मांडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. "मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून नाराजी व्यक्त करून संबंधित प्रकरणांवर तत्काळ कारवाई केली जाईल. त्यांनीही आमचं सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.", अशी माहितीही त्यांनी दिली.
"कर्नाटक सरकारच्या या वक्तव्यावर आपण लक्ष ठेवून आहोत, तसेच या प्रश्नी मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही कानावर ही बाब टाकणार आहे. आपल्याला विकासाच्या दृष्टीने राजकारण करायचे आहे. आपल्या संविधानाने कुणालाही कुठल्या राज्यात जाण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या राज्यात असे प्रकार होत असतील तर त्या राज्य सरकारने ते रोखले पाहिजेत. तसे न झाल्यास केंद्राला त्यात दखल घ्यावी लागेल. त्यामुळे कर्नाटक सरकारने जर का या प्रश्नी तोडगा काढला नाही तर निश्चितच हे प्रकरण मला केंद्राकडे न्यावे लागेल.", असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील काही पक्ष आता कर्नाटक प्रश्नी आंदोलन करत आहेत. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "एखाद्या घटनेवर प्रतिक्रीया येत असते. पण महाराष्ट्र हे न्यायपूर्ण अशा प्रकारचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणीही असं करू नये, असं माझं आवाहन असेल. महाराष्ट्र हे राज्य देशात आपल्या न्यायप्रियतेकरता ओळखलं जातं आणि अन्य राज्यांपेक्षा आमचं वेगळेपणही हे आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नेहमीच राहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना कोणीही करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला पोलीस रोखतील हेही मी या निमित्तानं सांगतोयं"
"सरकार गंभीर नाही आहे. कारण अ काही तारखा जाहीर करण्यात आल्या समन्वय मंत्र्यांच्या त्याचे दौरे रद्द झाले. याबाबत सर्व पक्षांशी चर्चा झाली नाही. आधी मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करायचे मात्र यावेळी अंमलबजावणी होत नाही आहे. आणि त्यामुळे सरकारी गंभीर दिसत नाही आहे. मुळातच या सगळ्या गोष्टीची सुरूवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलावलं होतं. पवारांनाही बोलावण्यात आलं होतं, विविध पक्षाच्या लोकांना बोलवून आणि सीमाभागातल्या लोकांना बोलवून पुढे काय करायचं याची चर्चा झाली. त्या चर्चेनंतरच हा वाद पेटला होता. याच बैठकीला कर्नाटक सरकारने उत्तर देणं सुरू केलं होतं. कर्नाटक राज्यालाही माझं सांगणं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली चालली असताना कुठलंही चितवणीखोर वक्तव्य करणं किंवा तिथली परिस्थिती बिघडवणं हे योग्य नाही आहे.
शरद पवार यांनीही आपण कर्नाटकमध्ये ४८ तासांत जाण्याचा इशारा दिला आहे. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, शेवटी त्या भागात राहणारे जे आपले लोकं आहेत ते नेहमीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात. त्यांची अपेक्षा आणि अपेक्षा असते की आपल्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. तो आपण देतो देखील. पण मला असं वाटतं की अठ्ठेचाळीस तासामध्ये पवार साहेबांना जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे केंद्र सरकार आणि तिथलं राज्य सरकार हे या परिस्थितीवर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल., असेही फडणवीस म्हणाले.