रवींद्र गोळे यांना डॉ. भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर
05-Dec-2022
Total Views |
मुंबई : साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना डॉ. भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार डॉ. हेडगेवार रुग्णालयातर्फे देण्यात येतो. सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ म्हणजेच डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी रवींद्र गोळे यांना जाहीर झालेला आहे.
हा पुरस्कार दि.1 जानेवारी 2023 रोजी संभाजीनगर येथे रा .स्व. संघाचे धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. दैनिक मुंबई तरुण भारत परिवाराकडून रवींद्र गोळे यांचे हार्दिक अभिनंदन.