गेल्या काही काळात देशातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना लक्षात घेता, विहिंप, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्यानिमित्ताने ‘लव्ह जिहाद’च्या मागील लैंगिक विकृती, उपभोगाच्या ‘सेक्स जिहाद’चे पैलू उलगडून दाखवणारा हा लेख...
प्रेम आणि लैंगिक उत्कटता (वासना) या परस्परविरोधी संकल्पना आहेत. लोक विशेषत: किशोरवयीन असे मानतात की, शारीरिक आकर्षण किंवा लैंगिक सुख म्हणजे शुद्ध प्रेम. या गैरसमजामुळे अनेक तरुण मुलींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना नैराश्य, मानसिक आघात, शारीरिक शोषण आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्या किंवा जोडीदाराकडून मारण्यात आले आहे. वासना आणि प्रेम यांच्यातील प्राथमिक फरक हा आहे की, वासना पूर्णपणे लैंगिक असते, तर प्रेम दोन्ही उत्कट आणि करुणामय असते. जोडीदारासोबत शारीरिकदृष्टीने जवळीक असणे, भौतिक शरीराबाहेरील त्यांच्या जीवनात फारसा रस नसणे आणि विचित्र शारीरिक शोषण करण्याची वेडसर मानसिकता असणे, ही सर्व वासनेची लक्षणे आहेत. भावनिकदृष्ट्या सुरक्षित असणे, मित्र आणि कुटुंबाला बिनशर्त स्वीकारण्यास उत्सुक असणे आणि नातेसंबंधात सुरक्षित वाटणे, ही सर्व प्रेमाची चिन्हे आहेत. जेव्हा ‘रेहान’ आपले नाव बदलून ‘राहुल’ करतो, ‘शाहबाज’ ‘शंतनू’ बनतो आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी कपाळावर टिळा लावतो, तेव्हा ते प्रेम कसे असू शकते? हा जीवनसाथी निवडण्याचा मार्ग आहे की, लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा सापळा?
मला माहित नाही की, तरुणींवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतर करण्याचा हेतू असताना ‘लव्ह जिहाद’ हा शब्द कोणी तयार केला? याला ‘सेक्स जिहाद’ म्हणता येईल का? प्रेमाच्या नावाखाली मुलींवर अत्यंत लैंगिक अत्याचार आणि शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याबद्दल व्हिडिओ आणि बातम्या नियमितपणे प्रसारित केल्या जातात. काही मुलींवर शारीरिक, मानसिक अत्याचार केले जातात, त्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जाते आणि घटस्फोट दिला जातो, तर काही आत्महत्या करतात किंवा त्यांची निर्घृण हत्या केली जाते, जसे की 35 तुकड्यांच्या मुलीची अलीकडील घटना होती.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी जानेवारी 2020मध्ये केरळ सरकारला चेतावणी दिली की ’लव्ह जिहाद’ हा एक टाईम बॉम्ब आहे, ज्याचा केरळ सरकारने कारवाई न केल्यास स्फोट होईल. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही महिला ‘लव्ह जिहाद’मुळे पीडित झाल्याचा दावा त्यांनी केला. रेखा शर्मा यांनी दि. 27 जानेवारी, 2020 रोजी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘’मी सक्तीचे धर्मांतर, ’लव्ह जिहाद’ आणि देशातून पळून जाणार्या महिलांची सखोल चौकशी केली. ’लव्ह जिहाद’च्या नावाखाली महिलांना बळजबरीने वेगवेगळ्या देशांमध्ये नेले जाते आणि त्यांचा लैंगिक वस्तू म्हणून वापर केला जातो.” शर्मा म्हणाल्या, “दुसर्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करणे ही समस्या नाही. परंतु, जबरदस्तीने धर्मांतर करणे ही एक समस्या आहे.”
त्याचवेळेस चर्चने असा दावा केला आहे की, ’लव्ह जिहाद’ हा ‘इस्लामिक स्टेट’च्या केरळमधील धार्मिक आणि सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. दि. 19 जानेवारी, 2020 रोजी ज्येष्ठ धर्मगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. सिरो-मलबार चर्चने दि. 14 जानेवारी, 2020 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, ‘लव्ह जिहाद’ आणि दि. 26 डिसेंबर, 2019 रोजी नायजेरियातील ‘इस्लामिक स्टेट’द्वारे ख्रिश्चन बंदिवानांना फाशीची शिक्षा यात समांतरता आहे, असे दर्शविले.
मुलींवरील अत्यंत घृणास्पद आणि भयंकर कृत्य पाहिल्यानंतरही अनेक माध्यमे, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था याकडे अल्पसंख्याक समाजाविरुद्धचे षड्यंत्र म्हणून पाहतात. आंतर-धर्मीय विवाहांची माहिती प्रसारित करणे ही मानवतावादी संस्था आणि सरकारांची जबाबदारी आहे, जसे की प्रतिवर्षी विवाहांची संख्या, धर्मांतर दर, शारीरिक, मानसिक अत्याचार किंवा हत्या झालेल्या स्त्रियांची संख्या आणि घटस्फोट झालेल्या स्त्रियांची संख्या. ही माहिती संपूर्ण मानवजातीसाठी डोळे उघडणारी ठरेल. हे लपवण्याचा हेतू या संघटना आणि राजकीय नेत्यांच्या हेतूवर संशय निर्माण करतो.
मी आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाही; तथापि, जर मुलींचे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या नष्ट करण्यासाठी त्यांचे धर्मांतर करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा त्यांचा हेतू असेल, तर समाजाने या धोकादायक सापळ्यातून मुलींना वाचवण्यासाठी कठोर कायदे करावेत, अशी विनंती सरकारकडे केली पाहिजे. आंतरधर्मीय विवाहात हिंदू पुरुषाने स्त्री जोडीदाराशी काही चुकीचे केले, तरी त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे आणि कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे.
पालक, शिक्षक आणि सामाजिक जबाबदारी
- पालकांनी आपल्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवला पाहिजे, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात आणि काळजीपूर्वक चारित्र्य घडवण्यावर भर द्यावा.
- प्रेमाच्या नावाखाली समाजात घडणार्या घडामोडींची त्यांना वेळोवेळी माहिती देत राहा.
- कौटुंबिक महत्त्व, सांस्कृतिक संस्कार आणि करिअर फोकसचे महत्त्व शिकवले पाहिजे.
- त्यांना हिंदू विवाह आणि कुटुंब पद्धती, विविध हिंदू प्रथा, इस्लामिक विवाह पद्धती, बहुपत्नीत्व, हलाला, मुतह निकाह, तिहेरी तलाक, ख्रिश्चन विवाह पद्धत, घटस्फोट प्रथा इत्यादी सर्व धार्मिक आणि सामाजिक प्रथा समजवून सांगितल्या पाहिजे.
- त्यांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या नवीन विकृतीची जाणीव होऊ द्या, जी त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा आणते, मौल्यवान भविष्याला हानी पोहोचवते आणि शारीरिकरित्या वापरल्या जात असल्याच्या भावनेतून मानसिक दबाव आणते, विशेषत: ही विकृती बहुतेक मुलींना अधिक हानी पोहोचवते, ज्यामुळे त्यांना नैराश्य, अमली पदार्थांचे व्यसनी, संस्कृती आणि समाजापासून दूर गेलेले आणि ’लव्ह जिहाद’चा आणखी एक सापळा तयार असतो.
- कोणत्याही धर्माबद्दल द्वेष निर्माण करणे, हे उद्दिष्ट नसून आपल्या बहिणी आणि मुलींना सामोरे जावे लागत असलेले कठोर वास्तव अधोरेखित करणे हे आहे. जर कोणी मानवतेचे मनापासून पालन करत असेल, तर तो हा मुद्दा कोणत्याही धर्मावर हल्ला न समजता मानवतेवर हल्ला म्हणून पाहील.
- पंकज जयस्वाल