bmc
मुंबई : प्रभाग क्र. ५१ मधील स्वतंत्र चाळ, विटभट्टी, गोरेगाव पूर्व येथे लोकांना पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता. त्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून आमदार विद्याताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने संदीप जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या परवानगीने आणि आपल्या स्वखर्चाने या जलवाहिनीचे काम आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून केले. हा प्रश्न सोडवल्यामुळे तेथील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ओमप्रकाश गुप्ता, दिलीप गडेकर, नीलकंठ गावडे, नरेश सराफ, जगदीश मेस्त्री, वेद प्रकाशजी, गणेश गायकर, सुनील सुकुम, अरुण कांबळे आणी ईतर सहकारी उपस्थित होते