नागपूर : कर्नाटक सरकार विरोधात महाराष्ट्र सरकारचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. बेळगाव कारवार निपाणीसह इतर ८६५ गावांना कर्नाटकात जाऊ न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सीमा प्रश्नी विधीमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात अनेक चुकीची मराठी शब्दरचना करण्यात आली आहे. व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. मराठीची दुर्दशा करणारा ठराव मांडून सरकार सीमा भागातील बांधवांची थट्टा करत आहे का ? असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुरुस्ती करुन ठराव मंजूर करावा, अशी मागणी पवार यांनी आज विधीमंडळात केली.
अजित पवार यांनी या ठरावावर घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याकरणापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत. परंतु ठरावात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कर्नाटक सरकारने त्यांच्या विधिमंडळात याआधी महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केला आहे.