मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जवळपास अडीच वर्षांनंतर कूपर रुग्णालयातील कर्मचारी रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ समोर आलाय. त्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नाही, तर हत्या झाल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील एक व्हीडिओ त्यांनी शेअर केला होता. सुशांतची बहिण श्वेता सिंह हिने हाच व्हीडिओ रिटविट् केला आहे. ती म्हणाली, "शाह यांच्या पुराव्यात तथ्य असल्यास, आम्ही सीबीआयला खरोखरच त्याकडे लक्ष देण्याची विनंती करतो. सीबीआयवर आणि तपास यंत्रणेवर आमचा विश्वास आहे," असे म्हटले आहे.
'सुशांतचा मृतदेह जेव्हा शवव्छिेदनासाठी कूपर रुगणाल्यात आणला तेव्हा त्यावेळी मृतदेहावर जखमा होत्या.त्याचे हात,पाय तुटलेले होते. शरीराला मुका मार लागलेला होता,' असा दावा रुपकुमार शाह यांनी केला. 'तसेच मी सर्वसामान्य कर्मचारी असल्याने त्रास होऊ नये म्हणून मी गप्प होतो.', जर सुशांत सिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली असती तर त्याच्या गळ्याला व्रण असते. पण तसे काहीच नव्हते,' असंही शाह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी.तसेच रुपकुमार शाह यांना सरकारणे सुरक्षा द्यावी,' असेही श्वेता सिंहने म्हटले आहे. श्वेताने हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केले आहे.