नवी दिल्ली : मन की बात कार्यक्रमाला संबोधित करताना काल "मन की बात"चा या वर्षातील शेवटचा म्हणजेच, ९६ वा एपिसोड होता. प्रंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील वनवासी समाजातील कुशल बांबू कारागीर लोकांकडून बांबू हस्तकला पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती दिली. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स, खुर्ची, चहादाणी, टोकेरी आणि ट्रे सोबत विविध गोष्टींची प्रशंसा केली तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू आज खूप लोकप्रिय झाल्या आहेत यामुळे वनवासी महिलांना रोजगार सोबतच मानसन्मान मिळत असल्याचे प्रंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमानंतर आपल्या ट्विटर हँडल वरून सेवा विवेक सामाजिक संस्थेचे पालघर जिल्ह्यातील सामुदायिक उपक्रमांसाठी विशेष कौतुक केले. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील वनवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतुने सेवा देतात.