मुंबई : कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.
भारतात आज 201 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तसेच देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
प्रवासी भारतीय संमेलनापूर्वी कोरोनाची दस्तक
या परिषदेत 60 देशांतील 6000 हून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. इंदूरच्या आरोग्य विभागाने कोरोना महामारीशी लढण्यासाठी सज्जतेचा दावा केला आहे. आरोग्य मुख्य वैद्यकीय अधिकारी बीएस सेटिया म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता दिसून आली.
आता ऑक्सिजन प्लांट उभारून टंचाई दूर झाली आहे. औषधे, सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट देखील पुरेशा प्रमाणात आहेत आणि गरज पूर्ण करण्यासाठी ब्लॉक स्तरावर पुरवठा केला जात आहे.