मुंबई : चीनमधील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, रिपब्लिक ऑफ कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, भारतीय सार्स-कोव्ह -2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (इन्साकोगॉगियम) च्या माध्यमातून व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणांच्या नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार कराव्या. यामुळे देशात पसरणाऱ्या नवीन व्हेरिएंट्सचा वेळीच शोध घेता येईल आणि त्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे सुलभ होईल.