देशातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना लक्षात घेता, विहिंप, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या देशव्यापी मोहिमेेचे स्वागतच. परंतु, या संघटनांच्या जनजागृतीला हिंदू बांधव आणि भगिनींनीही प्रत्यक्ष कृतीची जोड दिली, तर आणि तरच ‘लव्ह जिहाद’च्या विषारी षड्यंत्राला मुळापासून उखडून टाकणे शक्य होईल!
अलीकडच्या काळात घडलेल्या रुपाली चंदनशिवे, श्रद्धा वालकर यांच्या नृशंस हत्याकांडानंतर ‘लव्ह जिहाद’च्या दाहक सत्यतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले. खरंतर रुपाली, श्रद्धा यांच्या आधीही कित्येक मुली ‘लव्ह जिहाद’च्या प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकून बळी गेल्या. तेव्हादेखील नाही म्हणायला या विषयांवर केवळ चर्चा रंगल्या. आरोप-प्रत्यारोप झाले. काही पुरोगामी-सेक्युलर महाभागांनी तर ‘लव्ह जिहाद’ला काल्पनिक संकल्पना, हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यातले खूळ म्हणूनही हिणवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तो म्हणा अजूनही थांबलेला नाहीच. पण, रुपाली, श्रद्धाच्या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही हा अत्यंत संवेदनशील विषय आता प्राधान्याने अजेंड्यावर घेतला त्याचे कौतुकच. कारण, नुसत्या चर्चांतून, व्याख्यानांतून या प्रश्नाचे उत्तर सापडणार नव्हतेच. या जनजागृतीला व्यापक कृतिशीलतेचीही जोड तितकीच आवश्यक! त्यादृष्टीने बजरंग दलातर्फे दि. 1 ते 10 डिसेंबर दरम्यान ‘शौर्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदही 21 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये ‘धर्मरक्षा अभियान’ राबविणार असल्याचे समजते, तर दुर्गावाहिनीच्या माध्यमातूनही मुलींमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर विहिंपने ‘लव्ह जिहाद’च्या अशाच 420 घटनांचा, त्यांच्या बातम्यांचे दस्तावेजीकरण करून हा हिंदू समाजाला भेडसावणारा प्रश्न फक्त काही राज्यांपुरता नव्हे, तर देशव्यापी असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित केले. त्यामुळे देशात पुन्हा एकही ‘श्रद्धा वालकर’ होऊ द्यायची नसेल, तर आता हिंदुत्ववादी संघटनांच्या या जनजागृती अभियानाला हिंदू भगिनी आणि बांधवांनी बळ देण्याची हीच ती वेळ!
‘लव्ह जिहाद’ म्हणजे नेमके काय, हिंदू तरुणींना प्रेमाची भूल देऊन त्यांचे कसे धर्मांतर केले जाते, पुढे त्यांच्यावर इस्लामच्या रुढी-परंपरा पाळण्यासाठी कशी जोरजबरदस्ती होते आणि कालांतराने ती हिंदू तरुणी आपले ऐकत नाही म्हटल्यावर तिचा कसा करुण शेवट केला जातो, हे दुष्टचक्र अशा कित्येक प्रकरणांतून उघडकीस आले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पटलावर हिंदू मुलींना जाती-धर्मानुसार फसविणार्या मुस्लीम तरुणांना मिळणारे पैसे आणि तौफे यांचे ‘रेटकार्ड’च मांडले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही अशा वाढत्या घटनांची गांभीर्याने दखल देत, ‘लव्ह जिहाद’मुळे घरापासून दुरावलेल्या तरुणींची माहिती घेण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचे आदेशदेखील दिले. तेव्हा, या प्रकरणातील अशा सर्व बर्यावाईट बातम्या वृत्तपत्रांपासून ते समाजमाध्यमांवरही सरसकट वाचायला, बघायलाही मिळतात. पण, तरीही हिंदू पालकांपासून ते तरुणींपर्यंत ‘माझ्या मुलीबरोबर असे काही होणारच नाही’, ‘माझी मुलगी त्यातली नाहीच’, ‘माझा मित्र मुस्लीम असला तरी तो असा कट्टर, जिहादी वगैरे तर अजिबात नाही’ असे मनात पाळलेले गोड गैरसमजच पुढे अधिक घातक ठरतात.
त्यामुळे सर्वप्रथम हिंदू पालकांनी, तरुणींनी ‘लव्ह जिहाद’ ही हिंदुत्ववादी संघटनांची रचलेली कपोलकल्पित संकल्पना आहे, या अपप्रचाराला कदापि बळी पडता नये. ‘अशा घटना तर वैयक्तिक असतात, त्यांचा धर्माशी काहीएक संबंध नाही,’ ही देखील अशीच एक लोणकढी थाप. त्यामुळे मुळात हिंदू भगिनी आणि बांधवांसाठी यादृष्टीने पहिली पायरी म्हणजे त्यांनी ‘लव्ह जिहाद’चे, यांसारख्या विदारक घटनांचे अस्तित्व मान्य करायलाच हवे; तेही नुसतेच मान्य करून चालणार नाही, तर ‘हे माझ्याबरोबर, माझ्या मुलीबरोबरही यदाकदाचित घडू शकते’ असा काहीसा चिंताजनक विचार जोपर्यंत हिंदू पालक आणि तरुणींकडून जाणीवपूर्वक त्यांच्या स्वत:च्या मनावर, मेंदूवर बिंबवला जात नाही, तोपर्यंत या विषयाचे गांभीर्य, त्याचे भयंकर परिणाम यांची दाहकता मुळी लक्षातच येणार नाही. तेव्हा, ‘लव्ह जिहाद’ हेच मुळी थोतांड आहे, या तथाकथित बुद्धिजंतांच्या अपप्रचाराला हिंदू समाजाने कदापि बळी पडू नये, ही या व्यापक जनजागृतीची पहिली पायरी मानावी लागेल. कारण, जोपर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या वास्तवावरच हिंदू समाजाचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून सावधानतेच्या दृष्टीने पावले टाकली जातील, ही आशाच मुळी फोल ठरावी.
हिंदुत्ववादी संघटनांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी हा विषय अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्याची मांडणीदेखील तितकीच काळजीपूर्वक करणे गरजेचे. या विषयावर केवळ बौद्धिक आणि वैचारिक प्रवचने न झोडता किंवा फक्त रॅली-यात्रा न काढता, आजच्या हिंदू तरुणींना तो विषय पटेल, समजेल आणि रुचेल, या अनुषंगानेच एकंदरच अभियानाचा कल्पकपणे विचार करावा लागेल. त्यासाठी समाजमाध्यमांचा वापरदेखील तितकाच प्रभावी ठरावा. तरुणींमधील या विषयाच्या जनजागृतीसाठी शक्यतो त्यांच्याच वयोगटातील कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची साथ अधिक परिणामकारक ठरू शकते. कारण, एखाद्या ज्येष्ठ अथवा वयस्कर गृहस्थांनी याविषयी आजच्या काळातील तरुणींना याविषयी काही सांगितले, तर ते उपदेश, फुकटचे बौद्धिक डोस वगैरे समजून त्याकडे कानाडोळा होण्याची शक्यताच अधिक. पण, तीच गोष्ट याच ‘मिलेनियम’ पिढीतील स्वयंसेवकांनी या तरुणींना त्यांना समजेल, अशा भाषेत निदर्शनास आणून दिली, समजावली तर ती किमान ऐकली जाईल आणि त्यावर मोकळेपणाने चर्चाही करता येईल. हिंदू पालकांच्या बाबतीतही या विषयावर जनजागृती अभियाने राबविताना अशाच पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांना गांभीर्याने विचार करायला हवा. शक्य असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, कौटुंबिक सल्लागार यांसारख्या प्रोफेशनल मंडळींनाही यांसारख्या अभियानात सक्रियपणे सहभागी करून घेतल्यास पालकांनाही आपल्या मुलींशी या विषयावर नेमका संवाद कसा साधावा, त्यांना हा विषय न ओरडता, न चिडता कसा व्यवस्थित समजावून सांगावा, यांचे तंत्र अवगत करता येईल.
त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची ‘लव्ह जिहाद’विरोधी अभियाने, जनजागृती मोहिमा यांची यानिमित्ताने झालेली सुरुवात स्वागतार्हच! फक्त या मोहिमा आणि त्यातील संदेश प्रत्येक हिंदू भगिनीपर्यंत परिणामकारकपणे पोहोचायला हवा. या हिंदुत्ववादी संघटनांचा हिंदू पालकांना आणि भगिनींनाही आधार वाटायला हवा. अशी प्रकरणे आपल्या घरात, आसपास घडत असतील, तर अगदी नि:संकोचपणे त्याची जाहीर वाच्यता टाळण्यापेक्षा थेट मदत मागावी. ‘लव्ह जिहाद’वर कायदा होईल तेव्हा होईलच, पण त्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा हिंदू समाजाने आता एकजुटीने ‘लव्ह जिहाद’विरोधी या अभियानांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि व्यापक हिंदूहिताची वज्रमूठ अधिक घट्ट करावी!