भारतात आंदोलकांविरोधात लाठीमार किंवा अश्रुधुराचा वापर कधी कधी केला जातो. मात्र, चीनमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी पांगवली जाते. जागेच्या अभावी आपण फक्त ‘सोनिक गन’ या बंदुकीचे विश्लेषण करू. ‘सोनिक गन सोनिक रे फायर’ करते. ज्यांच्यावर ती फायर होते त्यांना अनेक जैविक परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की, ‘सोनिक व्हायब्रेशन’च्या मदतीने कानावरती, डोळ्यावरती, पोटावरती, किडनीवरती आणि मस्तकामध्ये नागरिकांना काही काळ वेदना होतात आणि इतर पुष्कळशा जैविक परिणामांना सामोरे जावे लागते.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने अनेक भागांत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. चीनमधील या ‘झिरो कोविड’ धोरणाबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात अजूनही निदर्शने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरून चीन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. यासोबतच ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.चीनमध्ये होणारी निदर्शने थांबविण्याकरिता, येथे येणार्या नागरिकांची संख्या कमी करण्याकरिता आणि निदर्शनांमध्ये भाग घेतलेल्यांना पकडण्याकरिता, चीन मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहे. उदाहरणार्थ- फेशियल रेकॉग्निशन, या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीमध्ये, निदर्शनामध्ये भाग घेतलेल्यांना, आरडाओरडा करणार्यांना, सोशल मीडियावरती चीन सरकारच्या विरोधात पोस्ट टाकणार्यांना, व्हिडिओ अपलोड करणार्यांना, गर्दीतून पकडत आहे आणि तुरुंगात टाकत आहे.
चॅट, मेसेजिंग अॅप्स, एनक्रिप्टेड अॅप्स, व्हॉट्सअॅपवरती लक्ष
चीन वेगवेगळ्या चॅट ग्रुपमध्ये, मेसेजिंग पमध्ये तिथल्या अॅडमिनला जबाबदार बनवून, तिथे टाकली जाणारी माहिती, पोस्टला सेन्सर करत आहे किंवा सरकारविरोधी पोस्ट टाकणार्यांना पकडत आहे.चीन प्रत्येक नागरिकाला आपल्या सेलफोनवर सरकारचे अॅप डाऊनलोड करायला भाग पाडत आहे, ज्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओज, मेसेजेस वरती लक्ष ठेवून सरकारला त्यांना पकडता येईल.कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तींना गर्दीतून नेमके पकडणे अतिशय आव्हानात्मक असते. चिनी पोलिसांना स्पेशल गॉगल्स किंवा चष्मे दिले गेले आहेत. ज्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उभे राहून तिथे असलेल्या संशयास्पद शक्तींना ते सरकारकडे असलेल्या डेटाच्या मदतीने, त्यांच्या चेहर्याच्या मदतीने पडू शकतात.
गर्दीच्या ठिकाणी रोबो पोलीस तैनात
चिनी सरकारने रेल्वे स्टेशन, बस स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी रोबो पोलीस तैनात केले आहे, जे गर्दीमध्ये लपलेल्या, जामिनावर पळून गेलेल्या, हिंसाचारात भाग घेतलेल्या संशयित व्यक्तींना पकडू शकते. हिंसाचार झाला की, तिथे हिंसाचार करणार्यांच्या शिवाय बघ्यांची किंवा आगंतुक नागरिकांची गर्दी जमा होते, ज्यामुळे हिंसाचारावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. अशा प्रकारचे बघे हिंसाचार बघण्याकरिता, त्याचे व्हिडिओज काढण्याकरिता, एकत्र झाले की ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या मदतीने चिनी पोलीस लगेच त्यांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेज पाठवतात, पटकन तिकडून चालले जा नाही, तर तुम्हाला पकडण्यात येईल. यामुळे बघ्यांची गर्दी कमी होते आणि हिंसाचार करणार्यांना पकडण्यात मदत मिळते.
सोशल मीडियावर असलेल्या प्रत्येक नागरिकांच्या पोस्टवरती लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या राहणार्या जागेची जोडले गेलेले आहे, त्यामुळे गरज पडली, तर त्यांना पकडणे सोपे होते. यामुळे जे नागरिक हिंसाचार झाल्यानंतर किंवा निदर्शनानंतर पळून गेले होते त्यांनासुद्धा त्यांच्या घरातून पकडले जात आहे.
भविष्य सांगणारे सॉफ्टवेअर (predictive software)
भारत डेटा प्रायव्हसीचे नियम आणि कायदे आणत आहे. मात्र, चीनने त्यांच्या नागरिकांची पूर्ण माहिती आधीच गोळा केलेली आहे. यामुळे भविष्य सांगणारे सॉफ्टवेअरच्या (predictive software) मदतीने जे नागरिक सरकारकरिता त्रासदायक बनू शकतील किंवा निदर्शनात भाग घेतील किंवा सरकार विरोधात लिहितील, अशांना ‘प्रेडिक्टीव्ह सॉफ्टवेअर’च्या मदतीने सांगितले जाते की, सरकारचे तुमच्या वरती लक्ष आहे, कुठल्याही सरकार विरोधामध्ये भाग घेऊ नका, याच सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना पकडले पण जाते.
कोरोना किंवा चिनी व्हायरसच्या काळामध्ये प्रत्येक चिनी नागरिकाला एक क्यूआर कोड देण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना कोरोना झाला आहे की नाही, हे कळायचे आणि हीच माहिती सरकारलासुद्धा असायची. जर कोरोना झाला असेल, तर त्यांचा कोड लाल रंगाच्या व्हायचा, ज्यामुळे त्यांना घराच्या बाहेर जाण्याकरिता किंवा गर्दी असलेल्या ठिकाणात जाण्याकरिता बंदी केली जायची. अर्थात, कोरोना नियंत्रणासाठी हे तंत्र वापरले जात होते. परंतु, आता याचा वापर चिनी सरकार नागरिकांना निदर्शनाला जाण्यापासून थांबवण्याकरिता करत आहे.
जर तुमचा ‘हेल्थ कोड’ लाल झाला, तर तुम्हाला कुठेही जाण्यापासून बंदी केली जाते. अशा प्रकारची बंदी अनेक नागरिकांवरती लादण्यात आली होती. कोरोना झाला नसला तरीही लोकांना ‘पब्लिक प्लेस’मध्ये जाण्यापासून थांबवण्याकरता, त्यांचा ‘हेल्थ कोड’ किंवा किंवा स्कॅन लाल करण्यात आला होता. अशा सगळ्या नागरिकांना त्यांच्या सेल फोनवरती मेसेज मिळत होता की, तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका.जे नियम तोडून घराच्या बाहेर पडले त्यांना पकडून डिटेन्शन किंवा आयसोलेशन सेंटर किंवा अलगीकरण विभागामध्ये पाठवण्यात येत आहे.
निदर्शनामध्ये भाग घेणार्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढण्याकरिता आणि त्यांची माहिती, लगेच कंट्रोल रूममध्ये पाठवण्याकरता, ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. ज्यामुळे आकाशातून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले जातात आणि भाग घेणारे कधीही सांगू शकत नाही की, आम्ही निदर्शनाकरिता गेलो नव्हतो. आकाशातून फोटो आणि व्हिडिओज काढणे अतिशय सोपे असते आणि यामुळे पूर्ण गर्दीवरती लक्ष ठेवणे अतिशय सोपे होते. मोबाईलच्या मदतीने एका वेळेला एकच व्हिडिओ काढता येतो. परंतु, ड्रोनच्या कॅमेर्याच्या मदतीने पुष्कळ जास्त जागेवर लक्ष ठेवता येते.
भारतात आंदोलकांविरोधात लाठीमार किंवा अश्रुधुराचा वापर कधी कधी केला जातो. मात्र, चीनमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी पांगवली जाते. जागेच्या अभावी आपण फक्त ‘सोनिक गन’ या बंदुकीचे विश्लेषण करू. ‘सोनिक गन सोनिक रे फायर’ करते. ज्यांच्यावर ती फायर होते त्यांना अनेक जैविक परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की, ‘सोनिक व्हायब्रेशन’च्या मदतीने कानावरती, डोळ्यावरती, पोटावरती, किडनीवरती आणि मस्तकामध्ये नागरिकांना काही काळ वेदना होतात आणि इतर पुष्कळशा जैविक परिणामांना सामोरे जावे लागते.बाकीच्या जगामध्ये ‘सोनिक गन’ अजून वापरण्यात आलेली नाही. परंतु, चीनमध्ये ती वापरली जाते. काही ‘सोनिक गन’ एवढ्या मोठ्या असतात, की त्यांना वाहनावर बसवले जाते आणि तिथून फायर केले जाते.
जगातली सर्वात मोठी सर्वसमावेशक ‘सरव्हेलन्स सिस्टिम’
चीनने आपल्या नागरिकांवरती लक्ष ठेवण्याकरिता जगातली सर्वात मोठी, सर्वात सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एक ‘सरव्हेलन्स सिस्टिम’ तयार केलेली आहे. तिच्या आसपास जगातले कुठलेही देश पोहोचू शकत नाही. या सर्व ‘सरव्हेलंस सिस्टिम’च्या मदतीने चीन आपल्या सगळ्या अल्पसंख्याक, उघूर मुस्लीम, तिबेट आणि मंगोलियामधील क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. कुठलीही सरकार विरोधी कारवाई दिसली की त्यांना लगेच रिफोरमेटरिजमध्ये पाठवले जाते.गेली अनेक वर्षे अत्याधुनिक तंत्रज्ञानवरती पश्चिम जगताचे अधिराज्य होते. परंतु, आता चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ‘न भूतो न भविष्यती’ अशा पद्धतीने शोध लावीत आहे आणि वापर करत आहे. यामुळे चीनला यापुढे चिनी सरकारच्या विरोधातील कुठलेही आंदोलन अगदी सहज चिरडता येईल.
जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने जाती-जमातीच्या म्हणजे उघूर मुस्लिमांचा शोध लावता येत असेल, ते यामुळे वंशवाद आणि मानवविकास भंगाचे जातीकरण होईल आणि अशा जाती आणि जमातीवर नेहमीच अन्याय केला जाईल. चीनला पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान आपल्या नागरिकांवरती लक्ष ठेवण्यासाठी लागू करण्यात अग्रेसर बनत आहे.१९८९ मध्ये तियानानमेन चौकातले आंदोलक, सुरू झाले आणि मेमध्ये बीजिंगमध्ये ‘मार्शल लॉ’ लावण्यात आला. ३ आणि ४ जूनला सैन्याने गोळीबार करत, आंदोलकांना चिरडत, या परिसराचा ताबा घेतला. दहा हजार नागरिक आणि काही डझन सुरक्षारक्षक त्यात मारले गेले.गेल्या ३३ वर्षांतील देशातील सर्वात मोठा विरोध दडपण्यासाठी चीन सरकार बंदुका आणि रणगाड्यांच्या ऐवजी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे.