पॅरिस : फिफा विश्वचषक स्पर्धत दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्कोच्या फुटबॉल टीमचा फ्रान्सच्या टीमने पराभव केला. त्यामुळे फ्रान्सची टीम अंतिम फेरीत दाखल झाली आहे. मात्र, मुस्लीम राष्ट्र असलेल्या मोरोक्कोतील कट्टरपंथींनी फ्रान्सच्या लिली, चॅम्प्स एलिसेस, एविग्नॉन या शहरांमध्ये दंगली घडवून आणली आहे. बेल्जियममध्ये दगडफेक सुरू करून दहशत निर्माण सुरु केली आहे. नेदरलँडमध्ये रस्त्यावर दहशत पसरली आहे.
मोरोक्काच्या टीमचा पराभव तेथील काही उपद्रवींना पचनी पडला नाही. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दंगली सुरू केल्या. यात १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सोशल मीडियात सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे फ्रान्स जिंकल्यावर एका फ्रान्सच्या नागरिकाने त्याच्या घराच्या बाल्कनीत फ्रान्सचा झेंडा लावला होता. यामुळे कट्टरपंथींनी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलीसांनी मध्यस्ती करत त्या नागरिकाला झेंडा उतरवण्यास सांगितले.