‘जी २०’ शिखर परिषदेस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सहभागी होणार

रशियन शेर्पा स्वेतलाना लुकाश यांची माहिती

    10-Dec-2022
Total Views | 69
putin
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रशियाच्या जी २० शेर्पा स्वेतलाना लुकाश यांनी दिली आहे.

भारताने १ डिसेंबर रोजी इंडोनेशियाकडून जी २० चे अध्यक्षपद स्वीकारले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे इंडोनेशियातील जी २० शिखर परिषदेस उपस्थित राहिले नव्हते. रशिया – युक्रेन संघर्षाची पार्श्वभूमी पुतीन यांच्या अनुपस्थितीस होती. मात्र, आता भारत – रशिया प्रगाढ संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतात होणाऱ्या शिखर परिषदेस पुतीन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


त्याविषयी बोलताना रशियन शेर्पा स्वेतलाना लुकाश म्हणाल्या, भारतामध्ये आयोजित होणाऱ्या जी २० परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमास रशियन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणे, विचार मांडणे आणि इतर भागिदार देशांच्या भूमिका जाणून घेणे रशियासाठी गरजेचे आवश्यक असून त्यासाठी रशियाचा पूर्ण सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या शिखर परिषदेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनदेखील सहभागी होण्याची दाट शक्यता असल्याचेही लुकाश यांनी सांगितले. रशियातील टिएएसएस वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.


उदयपूर येथे झालेल्या जी २० शेर्पा बैठकीदरम्यान, रशियन शेर्पा स्वेतलाना लुकाश यांनी भारत आणि भारतीय शेर्पा अमिताभ कांत यांचे 'महिला-नेतृत्व विकास' या गटाच्या प्रमुख प्राधान्यक्रमांपैकी ठेवल्याचे विशेष कौतुक केले होते.




अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121