कणकवली : संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे, तो एका राज्यापुरता लागू करता येत नाही. संपूर्ण देशात तो लागू झाला पाहिजे या भूमिकेचा आहे आणि ती कायम राहील, असे ठाम मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केले. कोकण दौऱ्यावर सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ही प्रतिक्रीया दिली आहे.
'वेडात मराठे वीर दौडले सात', या चित्रपटाविषयीही त्यांनी उल्लेख केला. गजानन मेहंदळे आणि जयसिंगराव पवार यांनी सांगितलेल्या इतिहासाबद्दलच्या दाखल्यांवर राज ठाकरेंनी चर्चा केली. मेहंदळेंनी दिलेल्या संदर्भांचाही त्यांनी उल्लेख केला, "जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात होते दहा होते, असं कुठेही लिहीलेलं नाही. प्रतापराव गुजरांसोबत आत्तापर्यंत कोण कोण होते याचा काहीही पुरावा नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना पत्र पाठविले ते आजतागायत कुठेही नाही. त्याचा पत्राचा उल्लेख एका ठिकाणी आहे. प्रतापराव गुजर मारियेला आणि प्रतापराव गुजर पडला, असाच उल्लेख आहे. त्यामुळे गजानन मेहंदळे यांनी सांगितलेलं हा संदर्भ बरोबर आहे," असा दुजोरा ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी यांनी आपल्या भेटीत दिल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "इतिहास तसा सांगायला गेला तर तसा तो रुक्ष आहे. त्यामुळे आहे तसा इतिहासाचे दाखले कुणाकडे उपलब्ध नसतात. ते त्यांचा तर्क मांडतात. त्यामुळे तर्काच्या आधारावर, चुकीचा अर्ध न लागू देता. इतिहासकार उभा करत असतात. त्यामुळे आपल्याकडे अलेला मूळ इतिहास हा पोर्तुगिज, मोगल, ब्रिटीश यांच्याकडून आलेल्या दाखल्यांशिवाय महाराजांच्या काळात आलेला एक ग्रंथ म्हणजे शिवभारत याशिवाय अन्य कुठलेही दाखले उपलब्ध नाहीत.
त्यामुळे चित्रपटात इतिहास दाखविताना सिनेमॅटीक लिबर्टीशिवाय ऐतिहासिक चित्रपट दाखविताच येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे शिवरायांच्या इतिहासाला धक्का लावणारा अजून मायेचा पूत जन्माला यायचा आहे.", असे म्हणत 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला.
राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलायची गरज नव्हती!
राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचारही त्यांनी घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायची आणि माध्यमांनीही त्यात फोडणी टाकल्याचा आरोप राज ठाकरेंनीही केला.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला टोला
मी आता फिरायला लागलो, तर काही जणांच्या पोटात गोळा यायला लागला, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्याबद्दल प्रश्न विचारला असता राज यांनी माझ्या पोटाबिटात कुठे गोळा कशाला येईल, असा टोला त्यांनी बंधू ठाकरेंना लगावला आहे.
जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहण्याची गरज!
इतिहास संशोधकांनी सध्या सुरू असलेल्या जातीपातीत अडकलेला इतिहास सांगण्यावरुन सुरू असलेल्या राजकारणावर बोलणे गरजेचे आहे. तसेच जातीपलिकडे जाऊन इतिहास पहाण्याची गरज आहे, असेही आवाहन राज ठाकरेंनी केले.