कल्याण : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करीत गळा चिरून हत्या

    01-Dec-2022
Total Views |

कल्याण
 
 
 
 
 
 
कल्याण : एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रंनी दिली आहे.
 
 
 
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात गुरूवारी सकाळी एक नऊ वर्षाच्या मुलींचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुले पोलिस ठाण्यातील पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान मुलगी फिरस्ता असल्याची माहिती मिळाली.
 
 
 
 
त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका तरूणांवर संशय बळावल्याने त्यांनी त्या संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे. या तरूणानेच मुलीवर लैगिंक अत्याचार करून तिचा गळा चिरून हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121