आजच्या तरूणांसमोर उद्योग, व्यवसाय करणे म्हणजेच आव्हाने ठरत आहे. परंतु आव्हानांनाही संधी मानून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे काही युवक आपल्याला दिसून येतात. असेच स्वत: चे अस्तित्व निर्माण करताना समाजातील गरजूवंताना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्तव म्हणून राहूल बोरोले यांनी आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही उद्योग उभारणीसाठी अनेक आव्हाने आणि अडथळयांना सामोरे जावे लागते.
ज्यांच्यामध्ये काही करण्याची नवी उमेद असते अशेच काहीजण यशस्वी होऊ शकतात. असेच नाव पुढे येते ते राहूल बोरोले यांचे. राहूल यांनी त्यांच्याकडे असलेल्या व्यवसायातून आणि त्यांच्या सततच्या प्रयत्नांतून त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात कसे बदल घडवून आणले हे त्यांच्या उद्देशातून दाखवून दिले आहे. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीचे कौशल्यासोबतच आर बी सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सीसह सोशल मीडिया मार्केटर म्हणून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून आपली वेगळे अस्तित्व निर्माण् केले आहे. त्यांच्या याच कार्याला सलाम म्हणून नुकताच उद्योजकांसाठी आयोजित केला जाणारा महाराष्ट्र विझनेस अवार्ड ्भिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्तो राहुल यांना प्रदान करण्यात आला आहे.
बॅक बेंचर असताना उमटवला ठसा
शाळेत असताना अभ्यासात काहीसा मागे परंतु देशाच्या घडामोडीवर सातत्याने चौकस असणारे राहुल बोरोले बॅक बेंचर म्हणून गणले जात होते. मात्र आज त्यांच्या कामातून बॅक बेंचरही आपला आगळा-वेगळा ठसा उमटवू शकतो हे सिध्द केले आहे. लहानपणी त्यांचे कुटूंब गरजूवंताना अन्न-पाणी देत असल्याने माणूसपण जपण्याची अन् सामाजिक कार्याचे बिज राहूल यांच्यामध्येही रूजले.
गरजूवतांच्या अन्न, शिक्षणावर भर
एकीकडे औरंगाबादचा विकास झपाटयाने होत असला तरी दुसरीकडे कोणी अन्न, पाणी आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहता कामा नये. यासाठी राहूल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, गरिबांना अन्न पुरवणे आणि वंचित मुलांच्या शैक्षणिक हक्कांवरही काम करत असतात. कोरोनाच्या काळात गरजूंच्या पाठीशी कसे उभे राहायला हवे हे शिकवले आहे. आज समाजातील दुसऱ्यांपर्यंत चांगुलपणा पोहचविण्यासाठी पुढे आले पाहिजेत अशी इच्छा राहूल बोरोले यांची आहे.