भिडे गुरुजींसमोर सुधा मूर्तीही नतमस्तक!

    08-Nov-2022
Total Views | 869
Sudha Murthy
 
पुणे ( Sudha Murthy ): उद्योजिका आणि सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी भिडे गुरुजी आणि सुधा मूर्ती यांच्यात चर्चा झाली. सध्या सोशल मिडीयावर सुधा मूर्ती आणि भिडे गुरुजींच्या भेटीची व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भेटीत सुधा मूर्ती भिडे गुरुजींच्या पायापडल्याने समस्त कथित पुरोगामी वर्तुळात शांतीचे वातावरण आहे.
 
थ्री थाऊजंट स्टीचेस, डॉलर बहु अशी सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी अनेक पुस्तके सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहेत. मराठी,इंग्रजी हिंदी असे अनेक भाषिक त्यांचे साहित्य वाचतात. एक यशस्वी उद्योजिका आणि लेखिका असणाऱ्या सुधा मूर्तींचे,  ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे जावई आहेत.
 
 
सोमवारी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी, सुधा मूर्ती या कोल्हापूर, सांगली इथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी कुरुंदवाडमधील त्यांच्या जुन्या घराची पाहणी केली. तसंच सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचीही सांगलीत एका कार्यक्रमात भेट घेतली. कोल्हापुरात त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम होता. यावेळी सुधा मूर्ती आणि त्यांची बहीण मंगला कुलकर्णी यांनी रंकाळ्याला भेट दिली. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेतले. याशिवाय प्रकाशक अनिल मेहता यांच्या वाचनालयाला आणि त्यांच्या घरालाही भेट दिली.
 
 
भिडे गुरुजी हे एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या विधानांमुळे त्यांना अनेकदा ट्रोल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. गुरुजींच्या कार्याविषयी देशातील अनेक मोठ्या नेत्यांच्या मनात आदराची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भिडे गुरुजीं विषयी गौरवपर शब्द काढले होते. 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121