अला अब्दल फतहची सुटका...

    08-Nov-2022   
Total Views | 56
 
अला अब्दल फतह
 
 
 
 
"मी इजिप्त सरकारकडे अला अब्दल फतहच्या तुरुंगवासाबद्दल आवाज उठवणार आहे. मानवी हक्क आणि ब्रिटिश नागरिक या दोन्ही आयामातून अब्दल फतहच्या सुटकेसाठी इजिप्त सरकारसमोर प्रश्न उपस्थित करणार आहोत.” ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश- इजिप्शियन मानवी हक्क कार्यकर्ता अला अब्दल फतहच्या नातेवाईकांना वरील संदेश दिला आहे. इतकेच नाही, वेतलाना एलेक्सिएविच, जेएम कोएत्जी, एनी एर्नाक्स, लुईस ग्लुक, अब्दुलरजाक गुरनाह, काज़ुओ इशिगुरो, एल्फ्रिडे जेलिनेक, मारियो वर्गास लोसा, पैट्रिक मोदियानो, हर्टा मुलर, ओरहान पामुक, रोजर पेनरोज, जॉर्ज स्मिथ, सोयिंका और ओल्गा टोकारज़ुक या नोबल पुरस्कृत साहित्यकारांनी अल अब्दलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
 
 
अला अब्दल फतहची तुरूंगातून तत्काळ सोडण्यात यावे, यासाठी या नोबेल विजेत्या साहित्यकारांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन अमेरिका, जलवायू दूत जॉन केरी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, महाराजा चार्ल्स तृतीय, फ्रान्सचेराष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना पत्र लिहिले आहे, तर दुसरीकडे अल अब्दल तुरूंगात गेल्या 200 दिवसांपासून दर दिवशी केवळ 100 कॅलरीज इतकेच अन्न ग्रहण करत आहेत. त्याच्या बहिणीने जाहीर केले आहे की, अल अब्दलची प्रकृती खूप ढासळली असून त्याने पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी ग्रहण केले नाही, तर 72 तासांनी त्याचा मृत्यू होऊ शकतो. सध्या इजिप्तमध्ये ‘कॉप-27 कॉन्फरन्स’ सुरू आहे. ‘कॉप- 27’ म्हणजे ‘युनायटेड नॅशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ द पार्टी.’
 
 
 
यामध्ये जगभरातले प्रमुख देश पर्यावरण आणि त्यासंदर्भात चिंतन करणार आहेत. उपाययोजना शोधणार आहेत. ही परिषद दि. 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नेमकी इजिप्तमध्ये शर्म अल शेख या शहरात होत आहे. या परिषदेच्या व्यासपीठावर जगातील बलाढ्य देश इजिप्तमध्ये एकत्रित होत आहेत. समता, स्वातंत्र्य, मानवी हक्क यांच्यासाठी सातत्याने जगभरातले देश आवाज उठवत असतात. हा धागा पकडूनच इजिप्तच्या तुरूंगात कैदेत असलेल्या अल अब्दल फतहच्या नातेवाईकांनी आणि त्यानेही तुरूंगातून तत्काळ सुटका व्हावी, यासाठी उपोषण सुरू केले आहे. त्या अनुषंगाने ब्रिटनच्या पंतप्रधानांनी अल अब्दलच्या सुटकेसाठी आवाज उठवू, असे म्हंटले आहे.
 
 
 
कोण आहे हा अल अब्दल फतह? तर 2010च्या सुमारास ‘अरब स्प्रिंग’ म्हणून मुस्लीम देशांमध्ये एक क्रांतिपर्व सुरू झाले. दमनकारी सत्ता किंवा राजघराण्याविरोधात अरब मुस्लीम देशातील युवकांनी बंड पुकारले. दि. 4 जानेवारी, 2011 ट्युनिशिया येथे पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून मोहम्मद बऊजिजी याने स्वतःला पेटवून घेतले. भ्रष्टाचार, दडपशाही, प्रशासनाची उदासीनता यामुळे इथली जनता त्रस्त होती. मोहम्मदच्या आत्मदहनाने इथली जनता पेटून उठली. त्यांनी सरकारविरोधात जनआंदोलन सुरू केले. भ्रष्ट सरकार उलथून टाकले. सोशल मीडियामुळे जगभरात या आंदोलनाचे लोण पोहोचले. त्यातल्या त्यात ट्युनिशियाच्या आजूबाजूच्या मुस्लीम देशांमध्ये हे आंदोलन त्यांच्या त्यांच्या सरकारविरोधात करण्यासाठी जनता एकवटली गेली. बहारीन, सीरिया, अल्जेरिया, इराक, सुदान, कुवेत, मोरक्को, इस्रायल, ओमान, सौदी अरब, पश्चिमी सहारा आणि इजिप्तमध्ये त्या देशाच्या जनतेने सरकारविरोधात आंदोलने सुरू केली.
 
 
 
इजिप्तमध्ये दि. 25 जानेवारी, 2011 रोजी जनआंदोलन सुरू झाले आणि ते तब्बल 18 दिवस चालले. इजिप्तचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. यानंतर इजिप्तमध्ये सत्तांतराचे बरेच खेळ झाले. इजिप्त सरकारने या सगळ्याला कारणीभूत अल अब्दल फतह याला ठरवले. देशात अराजकता माजवणे, बेकायदेशीर संघटन सुरू करणे, समाजमाध्यमांत,खोट्या बातम्या पसरवणे वगैरे वगैरे आरोप अल अब्दलवर लावण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून अल अब्दल इजिप्तच्या कैदेत आहे. ‘ह्युमन राईट्स वॉच’ या संघटनेचे म्हणणे आहे की, 60 हजारांपेक्षा अधिक राजनैतिक कैदी इजिप्तमध्ये तुरूंगात आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या मान्यवरांची मागणी मान्य करत इजिप्त अल अब्दल फतहची सुटका करेल का? हा प्रश्न आहे. कारण, अरब देश ‘अरब स्प्रिंग’ नावाचे सत्ता उलथवून टाकणारे वादळ विसरलेले दिसत नाहीत.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121