ही 'भारत जोडो' नव्हे 'मोदी हटाओ' यात्रा!

कितीही जण एकत्र या! मोदींना जनतेच्या मनातून हटवणं अशक्य : देवेंद्र फडणवीस

    07-Nov-2022
Total Views |

Devendra Fadnavis
मुंबई : राहुल गांधींची यात्रा ही भारत जोडो नव्हे तर मोदींविरोधात विरोधी पक्ष जोडणाऱ्यांची यात्रा आहे. भविष्यात कुणीही एकत्र आले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनमानसांच्या मनातून कुणीही हटवू शकत नाही, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा सुनियोजित पद्धतीने कशी मार्गाक्रांत करेल याची आम्ही सरकार म्हणून काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणावर भारत जोडोचा काही परिणाम होणार नाही. बॉलीवुड अभिनेते सहभाही होत नसल्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरोपांविरोधात बोलतांना फडणवीस म्हणाले की नाना असं दिवसभर काहीबाही बोलतच असतात त्याला प्रतिक्रीया देणं काही योग्यही नाही. आदित्य ठाकरे हे भारत जोडोत सहभाही होणार आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "ही भारत जोडो यात्रा नाही. मोदींना हटविण्यासाठी विरोधकांचा सुरू असलेला हा प्रयत्न आहे. परंतू, मोदींना सर्वसामान्य जनतेच्या मनातून हटवणं त्यांना इतक्या सहजासहजी सोप नाही.", असेही ते म्हणाले.

मध्यावधी निवडणूकांवर काय म्हणाले फडणवीस? 
महाराष्ट्रातील आणि देशातील वातावरण पहाता अनेक आमदार आपल्या पक्षातून सोडून जाण्याची भीती अनेकांना आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी मध्यावधीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. सरकार खंबीर आहे, त्यामुळे अशा वावड्यांकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही, असेही ते म्हणाले.

मराठा युवकांना तोपर्यंत 'या' आरक्षणाचा लाभ मिळणार!
ईडब्लुएस आरक्षणाबद्दल प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. आर्थिक मागास वर्गातील घटकांना याचा लाभच होईल, तसेच मराठा आरक्षणाचा निकाल जोपर्यंत लागू होत नाही, तो पर्यंत या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून ईडब्ल्युएस आरक्षणाचा हा निर्णय एक मैलाचा दगड ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या आर्थिक मागासवर्गीय घटकांना जे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आज वैध ठरला आहे. ज्यांना आरक्षण नाही किंवा अल्पसंख्यांक समाजातील गोरगरीब आहेत, त्यांनाही या दहा टक्क्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात आजच्या निकालाचा अभ्यास करुन मग पुढील आरक्षणाबद्दलही त्या त्या पद्धतीने न्यायालयात रणनिती ठरविली जाईल, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121