चंडीगड : शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे ते निदर्शने करत होते. त्याच वेळी गर्दीतील एका व्यक्तीने सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पंजाब पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
पंजाबचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अमृतसरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. सुधीर सुरी अमृतसरमध्ये मंदिराच्या बाहेर निदर्शन करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. सुरी यांच्याविरोधातील हल्ल्याची योजना गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. यापूर्वी दिवाळीत त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. चौकशीत आरोपींनी त्याबद्दलचा खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. गोळीबार करणाऱ्याच्या चौकशीतून याबद्दल पुढे तपास केला जाणार आहे.