नवी दिल्ली ( Rana Kapoor granted bail ) : दिल्ली उच्च न्यायालयाने येस बँकेचे माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर ४६६.५१ कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी १६ फेब्रुवारी रोजी त्यांना पीएमएलएच्या विशेष न्यायालयात जामीन मंजूर झाला होता. मात्र, इतर प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळू न शकल्याने त्यांना तुरुंगातच रहावे लागले होते. मार्च २०२० पासून कपूर तुरुंगातच आहेत.
सीबीआयने राणा कपूर ( Rana Kapoor granted bail ) आणि त्यांची पत्नी बिंदू आणि अवंता ग्रुपचे गौतम थापर यांची चौकशी केली होती. या चौकशीत येस बँकेत तब्बल ४६६.५१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. या आधारे डिसेंबर २०२१मध्ये ईडीने राणा कपूर यांच्याविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केल होता. संस्थापक असलेल्या राणा कपूर यांनी दिलेली तब्बल ४५ हजार कोटींची कर्जे बुडीत खात्यात गेली होती. यात त्यांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला (डीएचएफएल) दिलेले कर्ज सर्वात जास्त होते. यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई संचालनालयाने कपूर यांना अटक करून तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान ५०५० कोटी रुपयांचा तीन कंपन्यांमार्फत गैरवापर केल्याचे समोर आले होते.