दिल्लीच्या जामा मशिदीत ‘एकट्या’ मुलीस प्रवेश नाही – मशिद व्यवस्थापनाचा फतवा

- भारताचा सिरिया बनवण्याचा प्रयत्न - विहिंप

    23-Nov-2022
Total Views | 77
 
जामा मशिद
 
 
 
 
नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीमध्ये ‘एकटी’ मुलगी अथवा मुलींच्या समुहास प्रवेशबंदीचा नवा फतवा मशिद व्यवस्थापनाने जाहिर केला आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे भारताचा सिरिया बनविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला आहे.
 
 
देशाची राजधानी दिल्लीतील पुरानी दिल्ली परिसरामध्ये ऐतिहासिक अशी जामा मशिद स्थित आहे. ही मशिद मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाची असून दिल्लीत येणारे पर्यटकदेखील येथे भेट देत असतात. मात्र, आता जामा मशिदीच्या व्यवस्थापनाने महिलांचा अपमान करणारा नवा फतवा जारी केला आहे. फतव्यानुसार, जामा मशिदीमध्ये ‘एकटी’ मुलगी अथवा मुलींच्या समुहास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. देवनागरी आणि उर्दूमध्ये लिहिलेल्या या फतव्याची धातुची पट्टी जामा मशिदीच्या तीन प्रवेशद्वारांवर लावण्यात आली आहे.
 
 
त्या पट्टीवर projmd2000@gmail.com असा ई मेल आयडीदेखील दिला आहे. या प्रकाराविषयी माहिती घेण्यासाठीचा मेल सदर आयडीवर पाठवला असता त्यावर कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
 
 
एकीकडे आपल्या हक्कांसाठी मुस्लिम समुदायातील महिला जगभरात आंदोलन करत आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधात महिलांनी मुस्लिम कट्टरतावाद्यांविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे भारतात मात्र महिलांचे हक्क नाकारण्याची भूमिका मुस्लिम धर्मगुरुंकडून घेतली जात आहे.
 
 
मुलींवर नव्हे, द्वेषपूर्ण विचारांवर नियंत्रण ठेवा – विनोद बंसल, विहिंप
 
तिहेरी तलाक, हलाला आणि हिजाबहमध्ये मुस्लिम कैद करु पाहणारे जिहादी ठेकेदार व्याभिचाराचे अड्डे असलेल्या मदरशांमध्ये मुलींनी पाठविण्याची वकिली करतात, मात्र मशिदीमध्ये त्यांचा प्रवेश रोखतात, अशी टिका विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी केली आहे. ते ट्विटद्वारे म्हणाले, भारतास सिरिया बनविण्याची इच्छा असलेल्या मुस्लिम मुलतत्ववादी इराणमधील घटनांपासून बोध घेऊ इच्छित नाहीत. एकीकडे भारत सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा देते, तर दुसरीकडे मुस्लिम धर्मगुरू मशिदीमध्ये मुलींना बंदी घालत आहेत. एकटी मुलगी आज चंद्रावर जाते आणि मुस्लिम धर्मांध मात्र त्यांना जामा मशिदीवर जाण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे या कट्टरतावाद्यांनी देशातील मुलींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांच्या मनातील द्वेषपूर्ण विचारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121