दहशतवादी अर्थपुरवठ्यावर लगाम कसण्यासाठी ‘ईडी’कडून 200 मालमत्तांवर कारवाईची तयारी

    14-Nov-2022
Total Views | 27

ed
 
श्रीनगर : भारतीय सुरक्षाबले आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील आणखी जवळपास 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा दहशतवादाला केल्या जाणार्‍या अर्थपुरवठ्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
 
 
 
त्यांच्याविरोधात ‘युएपीए’अंतर्गत कारवाई केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, श्रीनगर, अनंतनाग, कुलगाम, शोपियाँ, पुलगाव, बडगाम आणि बारामुल्लाच्या या मालमत्ता कोट्यवधी रुपयांच्या आहेत. यामध्ये खासगी, राज्य आणि सामुदायिक जमीन, व्यावसायिक आणि निवासी परिसर आहे. बहुतांश संपत्ती प्रतिबंधित संघटना ‘जमात-ए-इस्लामी’च्या आहेत. यामध्ये ’जमात-ए-इस्लामी’च्या फलह-ए-आम ट्रस्टच्या शाळाही आहेत.
 
 
 
गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौर्‍यात दहशतवादी आणि त्यांना सहानुभूती दाखवणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ‘ईडी’ने दि. 4 नोव्हेंबरला फुटीरतावादी नेता शब्बीर अहमद शाहच्या घरावर जप्ती आणली होती. ‘ईडी’नुसार, शब्बीर दगडफेक, मोर्चा, आंदोलन, बंद, संपाच्या माध्यमातून काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरवण्यात सक्रिय रूपात सहभागी होता. त्याचे नाव हिज्ब-उल-मुजाहिदीन आणि पाकिस्तानमधील अन्य दहशतवादी संघटना आणि संस्थांकडून हवाला आणि अन्य माध्यमातून पैसे प्राप्त करणार्‍यांमध्ये होते. या निधीचा वापर काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि समर्थन देण्यासाठी केला जात होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121