मुंबई : मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ३ हजारांहूनअधिक कलाकृती एकाच इमारतीत पाहता येणार आहेत. या सर्व कलाकृतून ३०० हुन अधिक कलाकारांनी बनवलेल्या आहेत. हा महोत्सव ११ नोव्हेम्बरपासून १३ नोव्हेम्बर पर्यंत चालणार असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व इतर भागांतील सुमारे 300 समकालीन व प्रथितयश कलाकारांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती पाहता येतील.
चित्रे, शिल्पकृती, म्युरल्स, संकल्पशिल्पे, मांडणीशिल्पे आदींचा समावेश आहे. तैलरंग, ऍक्रिलिक रंग, पेस्टल, पेन अँड इंक, मिक्स मिडीयम ह्या माध्यमातील चित्रे व संगमरवर, टेराकोटा, ब्रॉन्झ, मेटल, फायबर, काष्ठ, स्टोन व मिक्स मिडीयम मधील शिल्पकृती एकत्रितपणे पाहता येतील. या कलाकृती काही मूर्त स्वरूपात आहेत तर काहीअमुर्त आहेत, ऍबस्ट्रॅक्ट पैंटिंग्स सुद्धा पाहता येतील.
इतर नवोदित कलाकारांसोबतच अनेक जेष्ठांच्याही कलाकृती या भागात मांडून ठेवलेल्या आहेत. टी वैकुंठम, सुहास रॉय, रमेश गोरजाला, लालूप्रसाद शॉ, सीमा कोहली यासारख्या अनेक कलाकारांसोबत बऱ्याचशा गुणवंत नवोदित कलाकारांची चित्रे व शिल्पाकृती मांडण्यात आली आहेत. ह्या सर्व कलाकृती निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, ऐतिहासिक परंपरा, वारसा व संस्कृतीविशेष दाखवणारी चित्रे, धार्मिक संकल्पनांवर आधारित पारंपारिक चित्रे,आधुनिक आणि अमूर्त जीवनातील वास्तव दर्शवणाऱ्या अनेक शिल्पाकृती ठेवण्यात आल्या आहेत. तैलरंग, जलरंग, ॲक्रिलिक, मिक्स मीडिया, चारकोल, फायबर, संगमरवरी खडक, धातू व इंक इत्यादी पदार्थ वापरून तयार केल्या आहेत.
भारतात विविध प्रांतात वेगवेगळी संस्कृती पाहायला मिळते. माणूस त्या त्या भागातील संस्कृती जपताना तिचेच प्रतिनिधित्व आपल्या अभिव्यक्तीतून करत असतो. संस्कृतीतून मिळणारी प्रतिभा त्याच्या कलेतून परावर्तित होते. या अशा संपूर्ण सुफळ भारताचे प्रतिनिधित्व जाणारे हजारो कलाप्रकार आपल्याला या एकाच इमारतीत पाहायला मिळणार आहेत.