‘बीबीसी’चे हिंदूविरोधी धोरण आणि ‘हिंदूफोबिक’ अजेंडा

लंडनमध्ये डझनभर हिंदू संघटनांची ‘बीबीसी’ कार्यालयाबाहेर निदर्शने

    01-Nov-2022
Total Views | 64
 
बीबीसी
 
 
 
 
लंडन: डझनभर ब्रिटिश हिंदू संघटनांनी ‘बीबीसी’च्या हिंदूविरोधी धोरण आणि ‘हिंदूफोबिक’ अजेंड्याविरोधात ब्रिटनच्या लंडनमधील ‘पोर्टलॅण्ड’ येथील ‘बीबीसी हाऊस’समोर जोरदार निदर्शने केल्याचे वृत्त आहे. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनमधील हिंदूंनी ट्विटरवर अभियानदेखील सुरू केले होते.
 
 
 
ब्रिटिश हिंदू संघटनांनी निदर्शनांची माहिती देताना सांगितले की, समाजमाध्यमांवर लक्ष्यित चुकीच्या माहितीला मुख्य धारेतील ब्रिटिश माध्यमे ‘द गार्डियन’ आणि ‘बीबीसी’ प्रोत्साहन देतात. यामुळे लिसेस्टरमध्ये हिंदूंविरोधातील हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले. यामुळे वर्षानुवर्षांपासून बहु-सांस्कृतिक सद्भावासाठी प्रसिद्ध लिसेस्टरच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला. ‘बीबीसी’चा भारत आणि हिंदूंचे नकारात्मक चित्रण करण्याचा जुना इतिहास आहे.
 
 
 
‘बीबीसी’चा निषेध करताना निदर्शनाच्या आयोजकांनी एक निवेदनही जारी केले. त्यात म्हटले की, इस्लामवाद्यांकडून लिसेस्टरमधील हिंदूंवरील हिंसक हल्ल्यांचे ‘बीबीसी’ने केलेले वार्तांकन आतापर्यंतचे सर्वात वाईट वार्तांकन होते. ‘बीबीसी’ जोपर्यंत जागतिक स्तरावर हिंदूंविषयी अमानवीयता आणि अमानवीयकरण बंद करत नाही, तोपर्यंत आम्ही विरोध करू.”
 
 
 
‘बीबीसी प्रोटेस्ट’च्या काही आयोजकांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तीही आहेत. त्यात डॉ. विवेक कौल, डॉ. स्नेह एस. कथुरिया, पंडित सतीश के. शर्मा, नितीन मेहता आणि दर्शन सिंह नागी यांचा सहभाग आहे. त्यांच्या मते, हिंदूंचे वर्णन करण्यासाठी ‘बीबीसी’कडून वापरले जाणारे शब्द अतिरंजित आहेत. त्यांच्या वार्तांकनामध्ये भारताचे वर्णन करण्यासाठी केवळ भीती, द्वेष, हिंसा, हिंदू-मुस्लीम, काश्मीर, गाय, जमाव आणि विरोध हे शब्द आहेत.
 
 
 
“कित्येक वर्षांपासून न थांबता हिंदूविरोधी आणि भारतविरोधी पूर्वाग्रह पसरवणार्‍या ‘बीबीसी’चा डझनभर ब्रिटिश हिंदू संघटना विरोध करत आहेत. ‘बीबीसी’च्या वार्तांकनामध्ये एक हिंदूविरोधी पूर्वाग्रह असून तो गेल्या 18 वर्षांत अधिकच वाईट होत गेला. ‘बीबीसी’ नियमितपणे घृणित मजकुराचा प्रसार करते,” असे सांगतानाच, “ज्या देशाने इतरांनी त्रास दिलेल्या पारशी, ज्यू, तिबेटी, बहाई आणि इतरही अनेकांना आश्रय दिला, त्यालाच असहिष्णु म्हणून कलंकित केले गेले,” असेही आयोजकांनी म्हटले.
 
 
 
“जगातील सर्वात मोठ्या लोकशाही आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या देशाबाबतचे पक्षपाती वार्तांकन स्पष्टपणे भारत आणि युनायटेड किंग्डमच्या राष्ट्रीय हितांविरोधात आहे,” असेही आयोजकांनी म्हटले. “ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत किरकोळ हिंसाचाराने ब्रिटिश माध्यम समूहांविरोधातील क्रोधाला प्रज्वलित केले, त्यातूनच हिंदूंची दुकाने, घरे, मंदिरे आणि वाहनांना लक्ष्य केले गेले. ‘द गार्डियन’ आणि ‘बीबीसी’च्या पत्रकारांनी हिंदुंनाच हल्लेखोर ठरवण्यासाठी बनावट माहिती प्रकाशित केली. काश्मीरमध्ये हिंदू आणि शिखांच्या जातीय संहाराच्या प्रतिक्रियेत मुस्लीम तरुण हिंदू कुटुंबांना ‘लिसेस्टर’ सोडण्यासाठी भीती दाखवत असल्याचे तपासाअंती समोर आले,” असेही आयोजकांनी म्हटले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121