नवी दिल्ली : आयटी म्हणजे माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा सेवा पुरवठादार देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये भारताकडून या सुविधा पुरवल्या जातात. भारतताही या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या आहेत. या क्षेत्रातील आकर्षक संधींमुळे कायमच हजारो इंजिनीयर्सची या क्षेत्राला पसंतीची असते. पण या क्षेत्राला नजीकच्या काळात मोठ्या उलथापालथींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याला कारण वाढती महागाई आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांची खर्च कपात.
अमेरिका, युरोपीय देश यांसारख्या देशांतील मोठ्या आयटी कंपन्यांनी आपल्या खर्चात कपात केली आहे, अमेरिकेत याच क्षेत्रातील १० लाख तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. याच थेट परिणाम भारतीय कंपन्यांचा महसूल घालण्यात होणार आहे. भारतीय कंपन्यांनाही आपल्या खर्चात कपात करावी लागणार आहे.त्यामुळे त्यांच्या कडून होणाऱ्या रोजगार भरतीत होणार आहे. यामुळे येणाऱ्या २०२३ या वर्षात कॉलेजमधून होणाऱ्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २० टक्कयांची कपात होणार आहे.
मंदी की स्टार्टअप्सना सुवर्णसंधी?
२०१४ नंतर देशात मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्स क्षेत्राला उत्तेजन देण्याचे प्रयत्न होऊ लागले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसायला लागला आहे. भारतात मोठया मोठ्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप्सना कंत्राटे देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवीन नोकर भरती न करताही कमी वेळात, दर्जेदार काम होण्यास मदत होत आहे. यामुळेच ही भारतीय स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी आहे. याचा फायदा घेण्यासाठी आता भारतीय स्टार्टअपक्षेत्र पुढे सरसावले आहे. सध्या जरी मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी घटणार असल्या तरी त्याचा फायदा या नवीन स्टार्टअप्सना होणार असल्याने भारतीय बाजार लवकरच सावरेल असाच अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.