सोमालियात इस्लामिक दहशतवाद्यांचा उच्छाद!

शंभर निरपराध नागरिकांचे घेतले प्राण!

    31-Oct-2022
Total Views | 74
somalia bomb blast

 
 
नवी दिल्ली ( somalia bomb blast ): पूर्व आफ्रिकन देश सोमालियासाठी शनिवार (२९ ऑक्टोबर २०२२) हा काळा दिवस ठरला. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये दोन कार बॉम्बस्फोटांमध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि हे भ्याड कृत्य म्हटले. इस्लामिक दहशतवादी संघटना अल शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बॉम्बस्फोट सोमालियाची ( somalia bomb blast ) राजधानी मोगादिशू येथील शिक्षण मंत्रालयाजवळील एका लोकांची वर्दळ असणाऱ्या चौकात झाले. खाण्यापिण्यापासून ते परकीय चलनापर्यंत इतर जीवनावश्यक वस्तू या चौकात उपलब्ध होत असल्याने तिथे मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. जास्तीत जास्त लोकांचा जीव घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणाला लक्ष करण्यात आले. राजधानी मोगादिशूमध्ये देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी इस्लामिक दहशतवादी संघटना अल-शबाबसह इतर दहशतवादी संघटनांशी सामना करण्याच्या प्रयत्नांबद्दल बैठक घेत असताना हा हल्ला करण्यात आला.
 
 
पहिला स्फोट ( somalia bomb blast )स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास झाला. दुसरा स्फोट एक रुग्णवाहिका येण्याच्या दरम्यान झाला. बॉम्बस्फोटानंतर शिक्षण मंत्रालयाला लक्ष्य करून गोळीबार झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. दोन्ही बॉम्बस्फोट इतके प्राणघातक होते की, आजूबाजूला बांधलेली घरे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले. एवढेच नाही तर घटनास्थळी उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
 
सोमालियाचे ( somalia bomb blast ) अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी सांगितले की, राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान १०० लोक ठार झाले असून ३०० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. राष्ट्रपतींनी या हल्ल्याला “अत्यंत क्रूर आणि भ्याड” कृत्य म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याआधी २३ ऑक्टोबर रोजी सोमालियातील ( somalia bomb blast )सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या किसमायो येथील तवाकल हॉटेलवर बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाला होता. ज्यामध्ये ४७ जण जखमी झाले तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121