नवी दिल्ली : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान देशभक्त आहेत आणि त्यांनी हाती घेतलेल्या अनेक योजनांनी भारत जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान मिळवू शकला आहे" अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या काळत भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाने जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका मिळवली आहे आणि फक्त दक्षिण आशियातच नव्हे तर संपूर्ण जगताच भारत एक स्वतंत्र स्थान प्राप्त करून बसला आहे असेही पुतीन यांनी सांगितले. दरवर्षी पुतीन करत असलेल्या वार्षिक संबोधनात त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांनी भारत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. तसेच रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध देखील दृढ करण्यावर नरेंद्र मोदींनी भर दिला आहे. त्यासाठी भारत - रशिया या दोन देशांमध्ये संरक्षण सामग्री तंत्रज्ञान तसेच विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांच्या वाढत्या व्यापारामुळेही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दृढ होत आहेत, याबद्दलही पुतीन यांनी संतोष व्यक्त केला आहे. यामुळे भारत आंतराष्ट्रीय पातळीवर एक महत्वाची शक्ती म्हणून उदयास येत आहे असेही पुतीन यांनी सांगितले.
आंतराष्ट्रीय राजकारणात भारताने सातत्याने आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे आणि त्या भूमिकेशी कधीच तडजोडही केलेली नाही. भारताच्या याच भूमिकेमुळे मानवतावादी आणि लोकशाहीवादी भूमिका घेणारा देश म्हणून ओळखला जातो आहे. त्याचीच पावती पुतीन यांच्या विधानांमधून दिसते. ही भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून यात बरच वेग आला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांचे कौतुक झाले आहे. रशिया - युक्रेन युद्धातील भूमिकेचेही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वागत होत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भारताच्या प्रतिमेला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे हे निश्चित.