नवी दिल्ली ( Prime Minister of Britain ): ब्रिटिशांनी हिंदूस्तानावर दीडशे वर्षे राज्य केले. मात्र, एक हिंदू ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे माजी चॅन्सलर ऋषी सुनक आणि कॅबिनेट मंत्री पेनी मोरडाऊंट यांच्यात लढत होणार आहे. सुनक यांना बहुतांश खासदारांचा पाठींबा असल्याने त्यांचा विजयाची शक्यता जास्त आहे.
युकेच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केवळ ४४ दिवसांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे युकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची निवडणूक ( Prime Minister of Britain ) होणार आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पक्षात मोठ्याप्रमाणात पाठींबा आहे. परंतु आता पुन्हा निवडणुकीला उभे राहण योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया देत जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
ऋषी सुनक यांचा जन्म यांचा जन्म १९८० मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या सुनक यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला ऋषी सुनक. मागच्या वर्षी ते रिचमंडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.
आपण हिंदू आहोत आणि दर विकेंडला मंदिरात जातो असे सुनक यांनी मोठ्या अभिमानाने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते.भारतीय उद्योगपती सुधा व नारायण मूर्थी या दांपत्याचे जावई असलेले सुनक यांना मोठ्याप्रमाणात खासदारांचा पाठींबा आहे. त्यामुळे सुनक यांच्या रूपाने एक हिंदू व्यक्ती युकेच्या पंतप्रधानपदी ( Prime Minister of Britain ) विराजमान होण्याची अशा पल्लवित झाली आहे.