मुंबई : मूळ कन्नड व त्यासोबत हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या कांतारा चित्रपटाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होताना दिसते. कन्नड चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूड वर्तुळातसुद्धा कांतारा चित्रपटाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने चित्रपट पाहून संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. त्याच बरोबर चित्रपट २०२४ साली ऑस्करसाठी पाठवावा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘कांतारा’ची कथा माझ्या गावामधली आहे, जी आज जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी विश्वास, परंपरा, प्रथा अशा गोष्टी जवळच्या वाटू लागल्या आहेत. लेखक म्हणून मी खूप जास्त खूश आहे.” असे म्हणत कंगना रानौतने दिलेल्या प्रतिक्रियेबाबत रिषभ शेट्टी यांनी कंगनाची आभार मानले आहेत. तसेच कंगनाची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलरवरून सुद्धा जाहीर केलेली आहे.
या सिनेमाच्या पुढील भागाबद्दल आपल्याला फार उत्सुकता आहे असे रिषभ यांबा वाटत आहे. या सिनेमाचे प्रीक्वलसुद्धा येऊ शकतो असे त्यांनी यावेळी म्हंटले.
बॉक्स ऑफिसवर तुफान कामे केल्यानंतर या चित्रपटाची वाढती लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी सदर चित्रपट अन्य भाषांमध्ये डबा करण्याचा विचार बोलून दाखवला आहे. रिषभ शेट्टी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा रिषभ शेट्टी यांनीच केले आहे.