नवी दिल्ली ( Bhagavad Gita taught Jihad ): धर्मनिरपेक्षतेचा खोटा बुरखा पांघरलेले काँग्रेसी नेते मनातून हिंदू आणि हिंदुत्वाचा कायम द्वेष करत असतात. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेसी नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, अशी गरळ एका कार्यक्रमा दरम्यान शिवराज पाटील यांनी ओकली. पाटील यांनी भगवत गीतेची तुलना थेट जिहादशी करून हिंदूंचा अपमान केला आहे.
दिल्लीत मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल, कुराण आणि गीता यांची तुलना केली. त्यावेळी शिवराज पाटील यांनी भगवत गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही ( Bhagavad Gita taught Jihad )अर्जुनाला जिहाद सांगायचे असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य शिवराज पाटील यांनी केले आहे.
शिवराज पाटील म्हणाले की, "मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे ( Bhagavad Gita taught Jihad ) तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे."
भगवतगीते बद्दल विष ओकताना ( Bhagavad Gita taught Jihad ) काँग्रेसी नेता हे विसरत आहेत कि हिंदूनी स्वतःहून कधीही इतर धर्मियांचे धर्मांतर घडवून आणले नाही. भगवत गीता वाचणाऱ्या हिंदूनी कधीही परकियांच्या भूमीवर आक्रमण केले नाही, कि धर्माच्या नावे त्यांच्या आया-बहिणींच्या इज्जतीवर हात टाकला नाही. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे उदाहरण आहे. गीतेत इतरांचे धर्मपरिवर्तन करा, असे कुठेही नमूद केलेले नाही. उलट जगण्याचे तत्वज्ञान मांडणारा गीता हा जगातील एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. परंंतू गीतेचा चुकीचा अर्थ लावून हिंदूबद्दल गैरसमज पसरवण्याचे षड्यंत्र काही काँग्रेसी नेते फार पूर्वी पासून करत आले आहेत. शिवराज पाटलांचे वक्तव्य देखील त्याचाच एक भाग आहे!