मुंबईतल्या बांग्लादेशी घुसखोरांना दणका! पालकमंत्री लोढांनी घेतला मोठा निर्णय

    19-Oct-2022
Total Views | 99

MP LODHA

मालवणी रोहिंग्या सर्वे



मुंबई
: मालाड मालवणी परिसरात राहणार्या बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या पी नॅार्थ प्रशासनाला या संदर्भात त्यांनी सूचना केल्या आहेत. मुंबईतील मालाड मालवणी भागात वाढत असलेली बांग्लादेशी रोहिंग्यांची घुसखोरी हा एक चिंतेचा विषय बनला होता. स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी बांधवांची सातत्याने कमी होत असलेली संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे स्वतः विरोधी पक्षात असताना मंगल प्रभात लोढा यांनी स्वतः विधानसभेत मांडले होते.

तत्कालीन ठाकरे सरकारने विशिष्ठ धर्मीयांच्या लांगूलचालनासाठी याकडे कानाडोळा केला होता. लोढांनी सातत्याने मालवणी पॅटर्नचा पाठपूरावा गेल्या काही वर्षांपासून केला होता. फडणीस-शिंदे सरकारच्या कार्यकाळात आता या प्रक्रीयेला गती मिळाली आहे. बांग्लादेशी-रोहंग्या घुसखोरांची संपूर्ण माहिती घेऊन ९० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आता मंगल प्रभात लोढांनी दिले आहेत. अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांमुळे भूमिपुत्रांच्या हक्कांच नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी स्वतः मंगल प्रभात लोढांनी जातीने लक्ष देऊन या सोडविल्या होत्या. या तक्रारीनंतर आता स्वतः मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा प्रश्न तडीस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. मालवणीतील रोहिंग्यांची माहिती सादर करणाऱ्या समितीत महापालिका उपायुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, सहा. पोलीस उपायुक्त व रेशनिंग अधिकारी यांचा समावेश असणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील आकडेवारीनुसार मालवणीतून सातत्याने कमी होत असलेली हिंदूंची लोकसंख्या हा चिंतेचा विषय मानला जात होता. लांगूलचालनासाठी उद्यानाला टीपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रयत्नही झाला होता. यानंतऱ भाजपसह अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत या विषयाला वाचा फोडली होती.






प्रस्थापित लोकप्रतिनिधींना मोठा दणका!


बांग्लादेशी आणि घुसखोरांना अधिकृत मतदार ओळखपत्र आणि पुरावे देऊन त्याचे मतदार संघ तयार करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींद्वारे केला जात होता. आता यानंतर सर्वच घुसखोरांची माहिती आकडेवारी सर्वच सादर होणार असल्याने अशा प्रकारांना आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे प्रस्थापित लोकप्रतिनिधींना धक्का मानला जात आहे.



दै.मुंबई तरुण भारतने वृत्तमालिकेतून केला होता पाठपुरावा! 


दै.मुंबई तरुण भारततर्फे मालवणीत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सातत्याने वाचा फोडण्यात आली होती. 'मालवणी पॅटर्न' असो वा उद्यानाला टीपू सुलतान मैदान असे नाव देण्याचा प्रस्ताव. सातत्याने असे विषय उजेडात आणून त्याविरोधात आवाज उठवण्यात आला होता. तसेच मंगल प्रभात लोढा यांनी 'मालवणी पॅटर्न'ला महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधानसभेत वाचा फोडली होती.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121