ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याला चाकूने भोसकले!

    15-Oct-2022
Total Views | 37
भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला
 
नवी दिल्ली (भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला): ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची बातमी पुन्हा एकदा समोर येत आहे. स्थानिक वृत्तानुसार, पैशांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने २८ वर्षीय भारतीय विद्यार्थी शुभम गर्ग याच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने अनेक वार केले आणि त्याला गंभीर दुखापत केली. आयआयटी चेन्नईमधून शिक्षण घेतल्यानंतर शुभम गर्ग इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे.
 
ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. त्यावेळी शुभम गर्ग हा पॅसिफिक हायवेवरून कुठेतरी जात होता. त्यानंतर डॅनियल नॉरवुडने गर्गच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर ११ वार केले. आरोपी डॅनियल नॉरवुड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
 
हल्ल्यानंतर रॉयल नॉर्थ शोर रुग्णालयात नेण्यापूर्वी शुभम गर्गने जवळच्या घरातून मदत मागितली होती, असेही ऑस्ट्रेलियन पोलिसांनी म्हटले आहे. शुभमवर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे.
स्थानिक वृत्तपत्र द कोव्हच्या वृत्तानुसार, गुरुवारी (६ ऑक्टोबर २०२२) पॅसिफिक हायवे लेन कोव्हजवळ, एका अज्ञात व्यक्तीने (नंतर आरोपीचे नाव डॅनियल नॉरवुड असल्याचे समोर आले) शुभमकडे पैशांची मागणी केली व धमकावले. जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. या घटनेनंतर आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले आणि भारतीय विद्यार्थ्याला मदत करण्यात आली.
 
अहवालानुसार, नॉर्थ शोर पोलिस एरिया कमांडशी संलग्न अधिकारी दुर्दैवी घटनेची चौकशी करत आहेत आणि स्ट्राइक फोर्स प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. गोसफोर्ड येथील रहिवासी असलेल्या संशयित नॉरवुडला घटनास्थळाजवळून अटक करून चॅट्सवूड पोलिस ठाण्यात नेण्यात आले (भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला), असे निवेदनात म्हटले आहे. त्याच्यावर चाकूने वार केल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हल्लेखोराच्या घरातून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी नेण्यात आल्या आहेत.
 
द कोव्हच्या वृत्तानुसार, आरोपीला जामीन नाकारण्यात आला आहे आणि पुढील वेळी तो न्यायालयात हजर होईपर्यंत तो कोठडीत राहील. शुभम गर्ग आणि आरोपी घटनेपूर्वी एकमेकांना ओळखत नव्हते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121