२६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित

    09-Jan-2022
Total Views | 218

Narendra Modi
 
 
 
नवी दिल्ली : साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.
 
 
 
 
  
ट्विट्सच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
 
 
"आज, श्रीगुरु गोविंद सिंगजींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र दिवसानिमित्त, मला हे सांगताना गौरव वाटत आहे की या वर्षापासून, २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' पाळला जाईल. साहिबजादेंच्या न्यायासाठीच्या लढ्याला आणि धैर्याला ही समर्पक श्रद्धांजली आहे.
 
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना भिंतीत जिवंत बंद करण्यात आल्यामुळे ज्या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले त्याच दिवशी ‘वीर बाल दिवस’ असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले.
 
माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सलोखा असलेल्या जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती कळणे ही काळाची गरज आहे.”
 
 
 
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. "श्री गुरू गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा. त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना बळ देतात. त्यांच्या ३५० व्या प्रकाश उत्सवाची संधी आमच्या सरकारला मिळाली त्याचा आनंद कायम स्मरणात राहील. पाटणा येथील माझ्या भेटीच्या काही आठवणी शेअर करत आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121