जयपूर : गुरुवारी, दौसा येथील एका गावातील शेतकरी जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि राजस्थान सरकारच्या गोंधळात टाकणाऱ्या धोरणांचा निषेध केला आहे ज्या धोरणांचा आधार घेत.बँकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा लिलाव केला आहे. कर्जमाफीची मागणी करत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानाबाहेर संतप्त शेतकरी म्हणाले की, काँग्रेस सरकारने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.
“शेतकऱ्याने काय करावे? अवाजवी कर्जामुळे आपण मरावे अशी सरकारची इच्छा आहे का? शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे माफ करणार असल्याचे सांगितले होते, पण ३ वर्षानंतरही आमची कर्जे माफ होताना दिसत नाहीत, असे शेतकरी म्हणाले.राहुल गांधींनी खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सांगितले की, गांधींनी जाहीर केले होते की १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल.पण असे काहीही झालेले नाही आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे,” ते पुढे म्हणाले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी अधिकार्यांना रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज अॅक्ट (RODA) अंतर्गत शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यास बँकांद्वारे लिलाव थांबविण्याचे निर्देश दिले. एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या लिलावावरून राज्य सरकारवर भाजपकडून तीव्र टीका झाल्याच्या एका दिवसानंतर ही माघार घेण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, बँकेचे कर्ज फेडू न शकलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. “त्याऐवजी, शेतकरी आणि बँक यांच्यात समझोता प्रक्रिया सुलभ केली जात आहे,” ते पुढे म्हणाले.काल, राजस्थानमधील दौसा येथील एका मृत शेतकऱ्याच्या जमिनीचा त्याच्या मृत्यूच्या अडीच महिन्यांनंतर कर्जाची रक्कम परत न केल्यामुळे लिलाव करण्यात आला. शेतकरी कुटुंबाने ७ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वाजवी मुदत मागितली होती परंतु बँकेने ती नाकारली होती.