नाशिक- उपचाराअंती 'रिंग' केलेल्या गिधाडाची भरारी; अंजनेरीत गिधाडाचे पुनर्वसन

    19-Jan-2022   
Total Views | 180
nashik



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नाशिक (पूर्व) वन विभागाकडून मंगळवारी जखमी गिधाडाला उपचाराअंती नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. हे गिधाड 'युरेशियन ग्रिफाॅन' जातीचे असून सोडण्यापूर्वी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) मार्गदर्शनाअंतर्गत या गिधाडाच्या पायाला 'रिंग' लावण्यात आली. यामुळे या गिधाडाच्या स्थलांतर मार्ग जाणून घेण्यास मदत होईल.

डिसेंबर, २०२१ मध्ये निफाडमध्ये 'युरेशियन ग्रिफाॅन' जातीचे गिधाड अशक्त अवस्थेत सापडले होते. हे गिधाड कमकुवत, निर्जलित आणि बंबल फुट आजाराने ग्रासलेले असल्याने 'इको-इको फाऊंडेशन'च्या स्वयंसवेकांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला नाशिकमध्ये हलवल्यानंतर 'बीएनएचएस'चे डाॅ. विभू प्रकाश माथुर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर गिधाडाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याआधी त्याच्या पायाला रिंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे त्याच्या स्थलांतर मार्ग जाणून घेता येऊ शकेल. यासाठी नाशिकमध्ये गिधाड सुरक्षित क्षेत्र स्थापन करण्यावर वनविभागासोबत कार्यरत असलेली 'नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी' यांनी 'बीएनएचएस'कडून पिवळया रंगाच्या रिंग मिळवल्या.


vulture

डॉ. विभु प्रकाश माथुरांकडून ऑनलाईन प्रशिक्षण घेवुन 'नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी'ने गेल्या आठवड्यात या गिधाडाच्या उजव्या पायात रिंग बसवल्या. या रिंग वरील सांकेतिक क्रमांक X 01 असा आहे. तीस दिवसांच्या उपचारानंतर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे पालन करुन रिंग लावण्यात आलेले गिधाड मंगळवारी अंजनेरी, वनक्षेत्र नाशिक (प्रादेशिक) येथे सोडण्यात आले. ही कामगिरी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, मनमाड डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला (प्रा.) अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरतेपथक वणी बशीर शेख, मानद वन्यजीव रक्षक व इको-इको फाउंडेशनचे अभिजित महाले व त्यांचे सहकारी तसेच नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, नाशिकच्या प्रतिक्षा कोठुळे व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
रेखा गुप्ता आप सरकारच्या काळात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे करणार ऑडिट

रेखा गुप्ता आप सरकारच्या काळात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे करणार ऑडिट

Rekha Gupta दिल्ली विधानसभेत भाजपने विजय मिळवल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या हाती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती देण्यात आली आहेत. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सर्वात आधी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्यात आले होते. त्यानंतर आता सत्तेबाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर या संबंधित अधिकृत माहिती रविवारी देण्यात आली होती. दिल्ली सरकारने आता २.६ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चौकशी करण्याचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121