किरीट सोमय्यांचा पुन्हा शिवसेनेवर वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2022   
Total Views |
 
kirit somaiya
 
 
 
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना हिट लिस्टवर घेतल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेकडे वळविला आहे. कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेली कंत्राटे आणि संबंधित इतर बाबींवरून सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मंगळवार, दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
'मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केला असून या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या यांनी केली आहे.
 
 
 
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिका हे एक कमाईचे साधन आहे. कोरोना काळामध्ये महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे गैरव्यवहार आणि लूट केली आहेते सर्व मी आपल्या समोर मांडणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कशापद्धतीने एजंटला दिले याची माहिती मी जाहीर करणार आहे,' अशा शब्दांत सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
 
 
 
'यशवंत जाधव , आ. यामिनी जाधव व जाधव कुटुंबियांच्या खात्यात प्रधान डीलर्स या कंपनीच्या खात्यातून १५ कोटी रु. विविध मार्गानी पाठवण्यात आले आहेत. प्रधान डीलर्स की कंपनी बोगस असल्याचे केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालय , अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्याने जाहीर केले आहे. अशा बोगस कंपनीचे शेअर्स ५०० रुपये प्रती शेअर खरेदी केल्याचे दाखवून जाधव कुटुंबियांच्या खात्यात १५ कोटी रु. इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण आयकर विभाग तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे,' असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
 
 
 
महापौरांवरही सोमय्यांचा प्रहार
'मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंपनी स्थापन करुन किश कंपनी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीला वरळीत डोम इथं कोव्हिड सेंटरचं काम दिले आहे. महापौरांनी लोकांना भीती दाखवत पैसे कमवले आहेत. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. तसेच वरळीचे स्थानिक आमदार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही निविदा न काढता महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटरचे काम दिले आहे,' असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.
 
 
 
दरम्यान, 'या कोव्हिड टेंडरचे स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, तसेच मुंबई महापालिका आयुक्तांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यासोबतच पुढील काळात कोरोना काळात महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात माहिती अधिकाराखाली आणखी काही गंभीर कागदपत्रे प्राप्त करू, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@