महाराष्ट्रातून प्रथमच या 'क्रिकेट फ्राॅग'ची नोंद; कोल्हापूरातील शाहूवाडीत अधिवास

    10-Jan-2022
Total Views | 184
frog



मुंबई (अक्षय मांडवकर) - बेडकाच्या 'मिनर्वर्या गोएमची' नामक प्रजातीची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात हा बेडूक आढळून आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तरुण जीवशास्त्रज्ञांनी या बेडकाची नोंद केली आहे.

'डायक्रोग्लॉसीड' या बेडूक वंशातील 'मिनर्वर्या' (डुबॉइस) कुळात ३७ प्रजातींचा समावेश होतो. या प्रजाती भारत (अंदमान बेटांसह), बांग्लादेश आणि थायलंडच्या उत्तरेकडील भागामध्ये आढळून येतात. यांना सामान्यतः 'क्रिकेट फ्राॅग' म्हणून ओळखले जाते. या ३७ प्रजातींची चार भिन्न प्रजातींच्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये 'मिनर्वर्या नीलगिरीका', 'मिनर्वर्या रुफेसेन्स', 'मिनर्वर्या सह्याद्रीन्स' आणि 'मिनर्वर्या सह्याद्रीएन्सिस' यांचा समावेश आहे. यामधील 'मिनर्वर्या नीलगिरीका' या गटामध्ये बसणारी बेडकाची 'मिनर्वर्या गोएमची' ही नवी प्रजात २०१७ साली शोधण्यात आली. गोवा राज्यातील सुरला गावामध्ये ही प्रजाती आढळली. त्यानंतर ही प्रजात प्रथमच महाराष्ट्रात आढळून आली आहे.

प्राणीशास्त्रज्ञ डॉ.ओमकार यादव, डॉ. तेजस पाटील आणि डाॅ. अमृत भोसले यांनी 'मिनर्वर्या गोएमची' ही बेडकाची प्रजात प्रथमच महाराष्ट्रातून नोंदवली आहे. यासंबंधीचे संशोधन वृत्त 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. याविषयी प्राध्यापक ओमकार यादव यांनी सांगितले की, "२०१४ साली जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील पाटणे गावात आम्ही उभयचरांच्या शोधमोहिमेसाठी गेलो होतो. त्यावेळी या क्रिकेट फ्राॅगच्या मादी प्रजातीचा नमुना आम्हाला त्याठिकाणी सापडला. या मादीचा आकार ५७ एमएम होता. या नमुन्यामध्ये वेगळेपण असल्याने हा नमुना आम्ही बंगळूरूच्या 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट'मध्ये (एनसीबीएस) गोळा केला. त्यानंतर २०१७ मध्ये ही प्रजात नवीन असल्याचा शोध लागला आणि आता ती महाराष्ट्रामध्येही सापडत असल्याचे लक्षात आले आहे."
अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121