मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहेत. चौथ्या निर्णायक कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी १० विकेट्सची तर इंग्लंडला जिंकण्यासाठी २९१ धावांची गरज आहे. अशामध्ये आता इंग्लंडमधून बह्र्तीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यांच्यासोबत संपर्कात आलेल्या संघाच्या ३ सपोर्ट स्टाफलादेखील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही चौथ्या कसोटी सामन्यावर याचा परिणाम होणार नाही. कारण, सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात आली असून कोणालाही लक्षणे नसल्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपीस्ट नितिन पटेल यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीमध्ये भारताला जिंकण्यासाठी आणखी २९१ धावांची गरज आहे. तर, शेवटच्या दिवशी भारतासमोर १० विकेट्स घेण्याचे मोठे आव्हान असेल. हा सामना जिंकणाऱ्या संघ ५ सामाण्य्नाच्या मालिकेत २ - १ अशी आघाडी घेऊ शकतो. तसेच, जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेतही मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे विराट सेनेसमोर हा सामना जिंकणे, हे खूप मोठे आव्हान आहे.