न्यूझीलंड : न्यूझीलंडच्या ऑकलंड सुपर मार्केटमध्ये दहशतवादींनी हल्ला केला आहे. हा हल्ला आयसिसच्या दहशतवादींनी केला असल्याचे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी जाहीर केलंय, या हल्ल्यात जखमींची संख्या सहा आहे. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे, तो व्यक्ती श्रीलंकन नागरिक आहे. तो व्यक्ती यापूर्वी २०११ मध्ये न्यूझीलंडमध्ये आला होता.
हल्ला केल्याला व्यक्तीला पोलिसांनी ठार केले. कोरोना विषाणूच्या धोकादायक डेल्टा प्रकारामुळे ऑकलंडमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. यामुळे येथे फारसे लोक नव्हते. हल्लेखोर हा एकटाच होता. त्या ठार केल्यानंतर इतर लोकांना काहीही धोका नव्हता. न्यूझीलंडच्याचे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाले की २०१६ रोजी पोलिसांनी या व्यक्तील किरकोळ वादावर अटक केली होती. तो दहशतवादी असल्याचे संशय पोलिसांना आला होता. तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.